राज्यातील सर्व शालेय शिक्षकांना ड्रेस कोड देणार -शिक्षणमंत्री दादा भुसे

शालेयवृत्त सेवा
0

 



                                      (संग्रहित छायाचित्र)

                                   


मुंबई ( शालेय वृत्तसेवा ) :

     राज्यातील सर्व शालेय शिक्षकांना गणवेश लागू करण्यात येणार आहे. शालेय शिक्षकांना राज्यात ड्रेसकोड लागू होणार असं शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सुतोवाच केले आहे. ड्रेसकोड साठी शासन निधी उपलब्ध करून देणार असल्याचे हे त्यांनी म्हटलं. मालेगाव तालुक्यातील अजंग येथील शाळेला त्यांनी भेट दिली होती त्यानंतर माध्यमाशी बोलताना त्यांनी हे सुतोवाच केले आहे. राज्यातील काही शाळा मधील शिक्षकांना ड्रेस कोड आहे तर काही जिल्ह्यातील शाळांमध्ये गणवेश नाही त्यामुळे सरकार सर्वच शाळा मधील शिक्षकांना गणवेश अनिवार्य करणार असल्याचं शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले असून त्यामुळे आता विद्यार्थ्यासोबत शिक्षकही गणवेशात दिसणार आहेत. 


     अजंग मधील शाळेत एका कार्यक्रमात बोलताना भुसे म्हणाले राज्यातील शिक्षकांनाही गणवेशात यावे लागेल त्यासाठी सरकारकडून निधी उपलब्ध करून दिला जाईल. राज्यातील अनेक शाळांमध्ये विद्यार्थी गणवेश घालत असले तरी शिक्षक मात्र व्यवस्थित पोशाख घालत नाहीत. ग्रामीण भागातील अनेक शाळांमध्ये शिक्षक यांचे राहणीमान निराशाजनक  आहे. शिक्षक हे विद्यार्थ्यांचे भविष्य घडवत असतात त्यामुळे शिक्षकांचे राहणीमान बोलीभाषा हेही विद्यार्थ्यांवर परिणाम करतात हे लक्षात घेत राज्य सरकार एक पाऊल पुढे टाकत आहे. वास्तविक याबाबत मागील सरकारमध्ये तत्कालीन शिक्षण मंत्री यांनी देखील याबाबत निर्णय घेतला होता. शासन आदेश हे निर्गम करण्यात आला होता. मात्र शिक्षक संघटनाने आक्षेप घेतल्याने नंतर त्याची अंमलबजावणी झालेली नाही. मात्र आता याबाबत  हा निर्णय अमलात आणण्याची आशा आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)