गंगापूर तालुक्यात अवघड क्षेत्रात कार्यरत शिक्षकांच्या बदली प्रक्रियेत फेरफार..
दोषीवर कारवाईची शिक्षक सेनेची मागणी
छत्रपती संभाजीनगर ( शालेय वृत्तसेवा ) :
अवघड क्षेत्रात कार्यरत शिक्षकांच्या बदली प्रक्रियेत फेरफार करण्यात आले असून, याची चौकशी करून संबंधितावर कारवाई करण्याची मागणी शिक्षक सेनेकडून करण्यात आली आहे.
यासंदर्भात पं.स.च्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना शुक्रवारी दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, सध्या शिक्षकांची जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया सुरू आहे. राज्यात ही प्रक्रिया पारदर्शकपणे राबविली जात आहे. मात्र, गंगापूर तालुक्यात शिक्षकांची माहिती अद्ययावत करण्याच्या शेवटच्या रात्री अचानकपणे अवघड क्षेत्रात कार्यरत शिक्षकांच्या माहितीत नियमबाह्यपणे सद्यस्थितीत कार्यरत ठिकाणी रुजू झाल्याच्या तारखेत १६ मे २०१९ असा बदल करून फेरफार करण्यात आला आहे.
त्यामुळे पूर्वीपासून सलगपणे अवघड क्षेत्रात कार्यरत संबंधिताच्या असूनही माहितीत बदल केल्याने अवघड क्षेत्रातील सेवा ज्येष्ठतेवर मोठा परिणाम झाला आहे. परिणामी, जिल्ह्यातील अवघड क्षेत्रातील ज्येष्ठता यादीदेखील पूर्णपणे बदलून जाणार आहे. त्यामुळे संबंधित दोर्षीवर कारवाई करा, अशी मागणी सेनेचे मराठवाडा उपाध्यक्ष अनिल काळे, जिल्हा सरचिटणीस भगवान हिवाळे आदींनी केली आहे.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .