उपक्रमशील शिक्षिका शितल गौरखेडे यांना अहिल्याबाई होळकर मातृशक्ती सन्मान..

शालेयवृत्त सेवा
0

 महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचा उपक्रम 



नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) : 

येथील शासकीय विश्रामगृहात पार पडलेल्या म.रा.शि.परिषद आयोजित सन्मान सोहळ्यात जि.प.प्रा.शाळा आष्टा तांडा तालुका माहूर येथील हुरहून्नरी तसेच उपक्रमशील शिक्षिका सौ.शितल सत्यवान गौरखेडे यांना 'अहिल्याबाई होळकर मातृ शक्ती सन्मान' पुरस्कार देऊन शासकीय विश्रामगृह नांदेड येथे सन्मानित करण्यात आले. 


                अदिवासीबहूल तसेच तांड्या वस्तीत डोंगराळ भागात एक महिला म्हणून काम करत असताना एक शिक्षिका, एक उत्तम प्रशासक मुख्याध्यापिका,उपक्रमशील तसेच प्रयोगशील अध्यापिका म्हणून सौ.शितल गौरखेडे यांचे कार्य आहे. तसेच स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन तसेच विवीध क्षेत्रात दिलेल्या आपल्या योगदानामुळे त्यांना हा सन्मान देण्यात  आला.यावेळी नांदेड मधील सर्व तालुक्यातून एका महीला शिक्षिकेस सन्मानीत करण्यास आले.


                      यावेळी अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षणिक महासंघाचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष मा.संजय कुमार राऊत,महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे प्रांत अध्यक्ष मधुकर उन्हाळे, विभागीय अध्यक्ष संजय कोठाळे,प्रांत प्रवक्ते तथा जिल्हा अध्यक्ष दत्तप्रसाद पांडागळे,जिल्हा सरचिटणीस दिगंबराव कुर्रे पाटील, जिल्हा कोषाध्यक्ष बालाजी पांपटवार, जिल्हा उपाध्यक्ष संजय मोरे, माहुर तालुका अध्यक्ष शेषराव पाटील, नांदेड तालुका अध्यक्ष भगवान बकवाड,कंधार तालुका अध्यक्ष मोमिन सर,माहुर तालुका संपर्क प्रमुख दीपक गाढवे, कंधार तालुका सचिव संगम कदम, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख विठ्ठल मुखेडकर,व भाग्यवान भवरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी त्यांचे अभिनंदन नगराध्यक्ष फिरोज दोसाणी, बेबीताई प्रदीप नाईक, ज्योतिबा खराटे, राजेंद्र केशवे, गोपू महामुने, मिलिंद कंधारे, अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला क्रीडा मंडळाचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष रमेश मुनेश्वर, डॉ. अरुण धकाते , विजय घाटे, सुधीर जाधव, रंजीत वर्मा, प्रवीण वाघमारे, संजीव वाठोरे, राजू मार्गमवार,आश्लेषा जाधव, जयश्री सूर्यवंशी, अर्चना आरेकर, यांच्यासह सर्वच स्तरातून त्यांचे कौतुक व अभिनंदन होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)