विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल!
दहावी नंतर ‘कलचाचणी’ पुन्हा सुरू होणार...?
शालेय शिक्षण विभागाकडे भविष्य घडवणारी ठोस मागणी!
मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे ) :
महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेतर्फे, मा. आमदार मनीषाताई कायंदे व शिक्षक नेते शिवाजी शेंडगेयांच्या पुढाकाराने, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे साहेब यांच्याकडे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण अशी मागणी करण्यात आली आहे.
"दहावी (SSC) नंतर विद्यार्थ्यांसाठी ‘कलचाचणी’ (Aptitude Test) पुन्हा सुरू करण्यात यावी!" या विशेष प्रसंगी श्री. ज्ञानदेव हांडे सर यांचीही उपस्थिती होते.
या मागणीमागील मूलभूत हेतू :
🔹 विद्यार्थ्यांना त्यांची स्वतःची क्षमता आणि आवड ओळखून योग्य करिअर मार्ग निवडता यावा.
🔹 व्यवसाय मार्गदर्शन अधिक सक्षम व प्रभावी बनवणे.
🔹 चुकीच्या अभ्यासक्रमामुळे होणारा वेळ, पैसा आणि मनस्ताप टाळणे.
विद्यार्थ्यांसाठी हे ठरेल एक ‘दिशादर्शक पाऊल’! या विद्यार्थिप्रिय मागणीमुळे हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य अधिक योग्य दिशेने घडू शकेल!!
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .