शाळेच्या सुरुवातीलाच जूनमध्ये विद्यार्थ्यांना मिळणार गणवेश

शालेयवृत्त सेवा
0

 




नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

      मागील वर्षी जिल्हा सह राज्यभरात गणवेशाचा घोळ शैक्षणिक वर्ष संपले तरी संपला नाही हजारो विद्यार्थी गणवेशापासून वंचित राहिल्याने त्यासाठी यावर्षी कापड शिलाईचे कंत्राट कंत्राटदाराना न देता गणवेशाचा निधी थेट शालेय व्यवस्थापन समितीच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना येत्या शैक्षणिक वर्षात वेळेवर गणवेश मिळेल यासाठी शिक्षण विभागाकडून नियोजन करण्यात येत आहे. 


     येत्या शैक्षणिक वर्षापासून शाळा व्यवस्थापन समिती मार्फतच या योजनेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतचे पत्र हे जिल्हा परिषद शिक्षण विभागाला पाठविले आहे मार्च महिन्यात गणवेशासाठी विद्यार्थ्यांचे मापेही घेण्यात आली आहेत. याशिवाय शाळा व्यवस्थापन समितीकडूनच नियमित गणवेशाचे रंगसंगती ठरविण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. दुसरा गणवेश स्काऊट व गाईड संस्थेने निश्चित केलेल्या रंगासंगतीप्रमाणे खरेदी करण्याचे अधिकार शाळा व्यवस्थापन समितीस देण्यात आले आहे. मागील वर्षे प्रमाणे बूट व पाय मोजे यंदा विद्यार्थ्यांना दिली जाणार नाहीत.


       विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी दोन गणवेश वाटप करण्याचे नियोजन केले आहे. समग्र शिक्षा अभियान कार्यालयाने जिल्हा परिषद शिक्षण विभागाला लेखी आदेश दिले आहेत. राज्यात समग्र शिक्षा अभियानामार्फत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत गणवेश दिला जातो आठवीपर्यंतच्या सर्व मुली तर दारिद्रय रेषेखालील मुलांना गणवेश वाटप केले जातात.


"येत्या शैक्षणिक वर्षापासून शालेय व्यवस्थापन समितीकडे विद्यार्थ्यांचे गणवेश खरेदी करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत या संदर्भातील गणवेशाचा निधी शालेय समितीकडे वर्ग करण्यात येणार असून विद्यार्थ्यांना जून महिन्यात वेळेवर शाळेत शालेय गणवेश मिळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. 

-सविता बिरगे

शिक्षणाधिकारी ( प्राथमिक )

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)