भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शिक्षणाधिकारी व्यंकटेश चौधरी यांचा विशेष उपक्रम
नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :
महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महानगरपालिकेच्या सर्व मराठी व उर्दू माध्यमाच्या शाळांमध्ये आगळ्या वेगळ्या उपक्रमातून अभिवादन करण्यात आले. महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी व्यंकटेश चौधरी यांच्या संकल्पनेतून महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये बाबासाहेबांच्या अभ्यासाची सवय विद्यार्थ्यांमध्ये रुजावी, यासाठी त्यांच्या वाचनव्यासंगाचा आदर्श चिमुकल्या विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासून अंगिकारावा या उद्देशाने एक तास वाचन करून अभिवादन करण्यात आले.
शालेय व्यवस्थापन समिती, पालक, शाळा परिसरातील सन्माननीय नागरिक यांच्या उपस्थितीत सर्व विद्यार्थ्यांनी मन लावून एक तासभर अभ्यासपूरक पुस्तकांचे वाचन केले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित मार्गदर्शन केले व व विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणामध्ये बाबासाहेबांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करून अभिवादन केले. अनेक विद्यार्थिनींनी भाषणात सहभाग घेऊन, बाबासाहेबांना अभिवादन करून त्यांनी सांगितलेल्या विचारावर चालण्याचा निश्चय केला. या अभिवादन कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, अनेक प्रतिष्ठित पालक उपस्थित होते. सर्व विद्यार्थ्यांना बिस्किटाचे वाटप करण्यात आले.
हा अभिवादन उपक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक परमेश्वर माहुरे, मुस्तफा खान, साईनाथ चिद्रावार, साहेबराव कल्याण, राजा पटेल, रहीम शेख, वंदना शिंदे, रेश्मा बेगम, आशा घुले, रत्नमाला अल्लमवाड, ज्योत्स्ना भगत, अजिज सिद्दिकी, शेख जफर, जरगर, रामराव साबळे व सर्व शिक्षक वृंद यांनी परिश्रम घेतले. या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी शिक्षणाधिकारी कार्यालयातील संजय ढवळे, संदीप लबडे, हनमंत भालेराव यांनी समन्वय म्हणून काम केले. प्रारंभी सर्व शाळेत मान्यवरांच्या उपस्थितीत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थी आणि शिक्षकांनी एक तास वाचन करून अभिवादन केले.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .