माननीय खासदार रविंद्र चव्हाण यांच्या पुढे शिक्षक संघटनेने शिक्षकांच्या समस्येचा वाचला पाडा..

शालेयवृत्त सेवा
0

 


खासदार मा.रविंद्र वसंतराव चव्हाण साहेब यांच्या पुढाकाराने सुटतील शिक्षकांचे प्रश्न !


नांदेड (शालेय वृत्तसेवा ) :

लोकसभेचे खासदार मा.रविंद्र वसंतराव चव्हाण साहेब यांनी स्वतः पुढाकार घेवून आपल्या भाग्यनगरस्थित कार्यालयात आज विविध शिक्षक संघटनांच्या पदाधिकार्यांशी शाळा, शिक्षक व जिल्हा परिषद, नांदेडच्या कारभारा विषयी सविस्तर चर्चा केली. विविध शिक्षक संघटनेचे विविध समस्या जाणून घेऊन ते सोडवण्याचे आश्वासन दिले.


      याप्रसंगी अखिल महाराष्ट्र प्राथमिक संघटनेचे राज्याध्यक्ष मा.देविदासराव बसवदे, इंडियन बहुजन टीचर्स असोसिएशन (इब्टा) चे केंद्रीय नांदेड जिल्हाध्यक्ष मा.बालासाहेब लोणे, लहानकर, सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी तथा शिक्षक नेते मा.अशोक पवळे, मा.विठ्ठल ताकबिडे, मा.चंद्रकांत दामेकर, आसचे मा.युवराज पोवाडे, शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष मा.शेख तस्लीम, शिक्षक काँग्रेसचे मा.बाबुराव कैलासे, साहित्यिक तथा इब्टाचे नांदेड जिल्हा उपाध्यक्ष मा.विरभद्र मिरेवाड, शिक्षक संघाचे मा.दत्तराम भोसले, मा.उद्धव मुळे, अखिलचे जिल्हाध्यक्ष मा.संतोष कदम, मा.अशोक पाटील, मा.सुधाकर थडके यांच्यासह विविध शिक्षक संघटनांच्या पदाधिकार्यांची याप्रसंगी उपस्थिती होती.


     याप्रसंगी इंडियन बहुजन टीचर्स असोसिएशन (इब्टा) चे केंद्रीय नांदेड जिल्हाध्यक्ष मा.बालासाहेब लोणे, लहानकर यांनी शाळा व शिक्षकांच्या खालील प्रश्नांना खासदार महोदयांनी वाचा फोडण्याची विनंती केली.


माननीय खासदार यांच्यापुढे शिक्षक संघटनेने पुढील मागण्या केल्या आहेत :

१) संयमान्यतेच्या नविन शासन निर्णयामुळे जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांची संख्या कमालीने कमी होणार असल्यामुळे ग्रामिण भागातील सामान्यांची मुले शिक्षकांअभावी  दर्जेदार शिक्षणापासुन कोसोदूर राहतील.


२) घटनेत कल्याणकारी राज्याची संकल्पना असल्यामुळे केवळ शाळा व शिक्षकांवर खर्च होतोय म्हणून २० पटाखालील शाळा बंद करण्यांच्या घाट घातला जात आहे. त्यामुळे विशेषतः  ग्रामीण भागातील खेडी, वाडी,तांडा, पाडयावरिल मुले शिक्षणापासुन वंचीत राहणार आहेत. संख्येने कमी असणाऱ्या मुलांना व पालकांना शिकण्याचा व शिकविण्याचा अधिकारा आहे. त्यामुळे कमी पटाच्या शाळा कोणत्याही परिस्थितीत बंद होता कामा नयेत यासाठी प्रयत्न करावेत.


३) गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शिक्षकांकडील सर्वच अशैक्षणिक कामे काढून घ्यावीत.


४) जिल्हा परिषद शाळांची थकीत विज देयके स्थानिक ग्रामपंचायतीला भरणा करण्यास भाग पाडावे.


५) नांदेड जिल्हा परिषदेचा कारभार बाबुगिरी व खाबूगिरी मुक्त करून सामान्य शिक्षकांना न्याय दयावा.


६) समुपदेशनाने व पारदर्शीपणे सर्व पदोन्नत्या करण्यात याव्यात.


७) जिल्हा परिषदेच्या पात्र शाळांना आंतराची अट न ठेवता सरसकट वर्गवाढ दयावी.


८ ) बदल्यांसाठी घोषित अवघड क्षेत्रांची पुर्नतपासणी करुन पात्र शाळा व गावांचा पुर्नसमावेश करावा.


९) शिक्षकांचे थकीत वेतन व वैद्यकीय विनाविलंब अदा करण्यात यावीत.


१०) विशेषतः किनवट व माहूर तालुक्यात कार्यरत शिक्षकांच्या थकीत एकस्तर वेतश्रेणीचा प्रश्न निकाली काढावा.

      यांसह इतर सर्व मागण्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार  असल्याचे आश्वासन खासदार मा.रविंद्र वसंतराव चव्हाण साहेब यांनी संघटना प्रतिनिधींना दिलेले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)