जिल्हा परिषदेत ३० जणांना अनुकंपावर मिळाली नोकरी.. सीईओंच्या हस्ते नियुक्ती आदेश वितरीत

शालेयवृत्त सेवा
0

जिल्हा परिषदेत ३० जणांना अनुकंपावर मिळाली नोकरी




सीईओंच्या हस्ते नियुक्ती आदेश वितरीत


अमरावती  ( शालेय वृत्तसेवा ) :

जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाने अनुकंपा तत्त्वावर नियुक्तीसाठी प्रतीक्षा यादीत पात्र असलेल्या उमेदवारांना ३० उमेदवारांना दि. २५ एप्रिल रोजी जिल्हा परिषदेच्या सेवा संवर्ग ४ मध्ये परिचर पदावर नियुक्ती देण्यात आलेली आहे. या नियुक्तीमुळे मागील कित्येक दिवसापासून नोकरीसाठी वेटिंगवर .असलेल्या उमेदवारांची अखेर प्रतीक्षा संपली आहे.


झेडपीच्या सीईओ संजिता महापात्र यांच्या हस्ते शुक्रवारी डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात आयोजित कार्यक्रमात 30 उमेदवारांना विविध ठिकाणी नियुक्ती आदेशाचे वितरण केले. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्यकार्यकारी नवनियुक्त अनुकंपाधारक उमेदवारांसह सीईओ संजिता महापात्र व अन्य. अधिकारी बालासाहेब बायस यांची उपस्थिती होती. सामान्य प्रशासन विभागाने. या अनुषंगाने आवश्यक प्रशासकीय कारवाईची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पहिल्यांदा जिल्हा परिषदेत एकाचवेळी पात्र असलेल्या ३० उमेदवारांना अनुकंपा तत्त्वावर नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे. यावेळी कनिष्ट प्रशासन अधिकारी पंकज गुल्हाणे, श्रीकांत मेश्राम, सतीश पवार, जीवन नारे, निशांत तायडे आणि इतर कर्मचारी उपस्थित होते.


यांना मिळाले नियुक्ती आदेश :

अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती मिळाल्यामध्ये चेतन माळोदे, ब्रिजेशबावने, गणेश दाभाडे, शुभम सुभाष भगवे, प्रथम राणे, सऊद अली साजीद अली, क्रांती कांडलकर, सुरभी वानखडे, यश हर्षद अढाऊ, अपूर्वा जिचकार, रेणुका केचे, वैदेही राठोड, प्रतीक रामटेके, पूजा इवनाते, युगल रामटेके, शेखर कांबळे, तुषार राठोड, ओमराज देशमुख, सुषमा धांडगे, कौशल सुने आस्था पोटे, अंश घोसे, पार्थ यावलकर, पवन पटोरकर, आदित्य वैद्य, अक्षय पटके, हर्ष हेरोडे, हर्षल धानोरकर, उदय सायवान आणि वेदांत लहाने आदी ३० जणांचा विविध ठिकाणी नियुक्ती आदेश देण्यात आले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)