महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा बीड यांचा उपक्रम !
बीड जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचा मेळावा उत्साहात संपन्न
बीड ( शालेय वृत्तसेवा ) :
बीड जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचा भव्य शिक्षक मेळावा व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा दि.१७ एप्रिल २०२५ रोजी शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली व राज्याध्यक्ष बाळासाहेब मारणे यांच्या अध्यक्षतेखाली भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन बीड या ठिकाणी उत्साहात संपन्न झाला .
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून बीड जिल्हा परिषदचे शिक्षणाधिकारी मा. भगवानराव फुलारी साहेब, राज्य सरचिटणीस कैलास दहातोंडे, राज्य कार्याध्यक्ष किशन इदगे, उपशिक्षणाधिकारी श्रीम. मैनाताई बोराडे मॅडम, केजचे कर्तव्यदक्ष गटशिक्षणाधिकारी श्री बेडसकर, बीड जिपचे जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी भगवान सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते शांतीनाथ डोरले, जेष्ठ नेते अंकुश डाके, गेवराई शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन विष्णू खेत्रे, राज्य कार्यकारणी सदस्य नामदेव शिंदे , विभागीय उपाध्यक्ष बाबासाहेब सारुक, जेष्ठनेते बाळासाहेब शेंदुरकर, छत्रपती फांउडेशनचे सचिव शामराव मुळे, मैत्रा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष द. ला. वारे, शिक्षक नेते सचिन पिसाळ, छत्रपती शिवाजी महाराज पतसंस्थेचे सचिव विजय खोसे, आष्टी पतसंस्थेचे सचिव महेश शिंदे, खजीनदार जितेंद्र पोथरकर , संचालक गोविंद वायकर, जेष्ठ नेते उमाकांत सोळंके, मार्गदर्शक नेते हिरालाल जाधव, माजलगाव शिक्षक पतसंसचे उपाध्यक्ष विठ्ठल आरबे उपस्थित होते .
कार्यक्रमाच्या प्रस्ताविकात जिल्हाध्यक्ष भगवान पवार यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार देण्याचा उद्देश व बीड जिल्ह्यातील शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न मांडले. राज्य सरचिटणीस कैलास दहातोंडे यांनी शिक्षक संघाचा इतिहास व राज्य संघाच्या कामकाजाचाआढावा सांगितला. शिक्षणाधिकारी मा.भगवानराव फुलारी साहेब यांनी अभ्यासपूर्ण मनोगतामध्ये गुणवत्ता वाढीसाठी शिक्षक संघाने पुढाकार घ्यावा, जरेवाडी पर्टनच्या कामात बीड जिल्हयातील सर्व शिक्षक बांधव सक्रिय काम करतात याबद्दल समाधान व्यक्त केले व जिल्ह्यातील शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न शिक्षक संघाच्या माध्यमातून सोडवण्याचे अभिवचन दिले .
राज्याध्यक्ष बाळासाहेब मारणे यांनी अध्यक्षीय मनोगतामध्ये गेल्या दोन महिन्यात राज्यसंघाने शासनाकडे संचमान्यता, जुनी पेन्शन, बदल्या , वैद्यकिय कॅशलेस सुविधा या व इतर प्रश्नावर उपमुख्यमंत्री, ग्रामविकासमंत्री, शिक्षणमंत्री, आरोग्यमंत्री, ग्रामविकास व शिक्षण सचिव यांच्याकडे प्रलंबित प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याची माहिती दिली तसेच शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात शिक्षक संघाची पुनर्बांधणी करून युवा पिढीला नेतृत्वाची संधी उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले , संच मान्यतेच्या प्रश्नासाठी राज्यसंघ स्वखर्चाने मा.उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे असे सांगितले.
बीड जिल्ह्यात शिक्षण क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या ५२ शिक्षक बंधू / भगिनींचा यावेळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार देवून गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बीड जिल्हा शिक्षक संघाच्या महिला आघाडी सरचिटणीस श्रीम सुनंदा उगलमुगले यांनी केले. आभार शिक्षक संघाचे नेते बिभीषण पाटील व सरचिटणीस परमेश्वर शिंदे यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बीड जिल्हयातील शिक्षक संघाचे पदाधिकारी जिवन बागलाने , महिला आघाडी जिल्हाध्यक्ष पुष्पा लोमटे , रत्नाकर वाघमारे , बाळीराम आकुशकर, बप्पासाहेब देवगुडे , बिभिषण हावळे ,परमेश्वर बिडवे , तुकाराम राठोड , महादेव घोडके , अंकुश काटे , संजय चौरे , आच्यूत आर्दड , बंडू घोरड , निलेश चव्हाण ,अरुण पवार , संदीप खराडे , राजेसाहेब सोमवंशी , विष्णू खेडकर , महादेव खिल्लारे , अमोल काळे हरिचंद्र सोनवणे ,उद्धव बडे, बंडू वरपे , जिवन हाडूळे , संजय वागुले , सुनिल शिंदे , अशोक भांगे , बाळू कदम , आनंद लाड ,तात्या गडदे , बागलसर ,रवी मोरे, गायकवाड नाना, दिगांबर देवकते , दिलीप डोळस , तुकाराम घोडके , गोपाळ पवार , जगन्नाथ जाधव , आस्लम शेख अजित मुळूक, बंडू नागरगोजे, शेळके सर, सोनवणे सर, दत्तात्रय वरपे, रमेश पिसाळ, पांढरे सर, कोकणे सर, अमर संगा, अच्युत राठोड, कैलास राठोड, निवृत्ती आंधळे, अभिमान कुटे,अशोक जाधव, मनोज कवडे, संभाजी शिंदे,ब्रह्म घोडके,रघु यादव,राजू बुच्छलवार यांच्यासह सर्व पदाधिकारी यांनी प्रचंड मेहनत घेतली.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .