बारड येथे शिक्षण परिषद यशस्वीरित्या संपन्न

शालेयवृत्त सेवा
0

 


नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

मुदखेड तालुक्यातील बारड येथे नुकतीच शिक्षण परिषद उत्साहात पार पडली. शिक्षण परिषदेची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून शिष्यवृत्ती नवोदय एन एम एस परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या वर्ग शिक्षकांचे स्वागत करण्यात आले व नवीन शिक्षक व मुख्याध्यापक यांचा सत्कार करण्यात आला प्रस्ताविक केंद्रप्रमुख अरुण पाटील यांनी केले या परिषदेत विविध शैक्षणिक उपक्रम व धोरणांवर चर्चा करण्यात आली.


केंद्रप्रमुख अरुण अतनुरे पाटील यांनी परिषदेला मार्गदर्शन करताना निपुण महाराष्ट्र या उपक्रमाविषयी सविस्तर माहिती दिली. त्यांनी विद्यार्थ्यांच्या मूलभूत साक्षरता व अंकगणित कौशल्य विकासावर भर देण्याचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच 25 एप्रिल रोजी माननीय आयुक्त व संचालक यांनी दिलेल्या सूचनाचे अंमलबजावणी करण्यासाठी सर्वांना मार्गदर्शन केले.


कार्यक्रमात गणित या विषयावर सौ. छाया पाटील मॅडम यांनी प्रत्यक्ष शैक्षणिक साहित्यातून अनुभूती दिली आणि भाषा या विषयावर श्री टोम्पे सर व वाठोरे सर यांनी मार्गदर्शन केले शिक्षक, यावेळी केंद्रीय मुख्याध्यापक संजय माहुरकर हायस्कूल बारड चे मुख्याध्यापक सविता मेटकर अंतर्गत सर्व मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते परिषदेमुळे शिक्षण प्रक्रियेत अधिक परिणामकारकता आणण्यासाठी सकारात्मक दिशा मिळाली आहे. सूत्रसंचालन राजू टोम्पे यांनी केले व आभार प्रदर्शन श्री अंबड सर यांनी केले व परिषदेची सांगता करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)