तरुणांनो, तयारीला लागा ! राज्यात सप्टेंबरमध्ये १०,००० पोलिसांची भरती;
पोलिस अधीक्षक, आयुक्तांसोबत अप्पर पोलिस महासंचालकांची बैठक; एका पदासाठी एकाच अर्जाचे बंधन !
◾राज्यात वाढती लोकसंख्या व गुन्ह्यांच्या प्रमाणात पोलिसांचे मनुष्यबळ कमीच आहे. नवीन पोलिस ठाण्यांच्या निर्मितीचा व वाढीव पोलिस ठाण्यांचा निर्णय अजूनही कागदावरच आहे. त्यामुळे २०२४-२५ या वर्षात रिक्त झालेल्या १० हजार पोलिसांची भरती सप्टेंबरमध्ये सुरू केली जाणार आहे.
◾नेमकी रिक्तपदे किती याची माहिती घेतली जातेय, सप्टेंबरपासून भरतीचे नियोजन. .
◾१ एप्रिल ते ३१ डिसेंबर २०२५ या काळात सेवानिवृत्तीने किंवा अन्य कारणाने रिक्त होणाऱ्या पदांची माहिती, बिंदुनामावली आणि आगामी पोलिस भरतीसाठी (२०२४-२५) वर्षातील रिक्तपदे, अशी माहिती मागविली आहे. पावसाळ्यानंतर होणाऱ्या नवीन पोलिस भरतीसाठी नेमकी किती पदे असतील, याची संख्या एप्रिलअखेर निश्चित होईल. त्यानुसार सप्टेंबरपासून भरतीला सुरवात करण्याचे नियोजन आहे.
🙏 महत्वाची माहिती इतरांना देखील शेअर करा..
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .