जागतिक महिला दिनानिमित्त लोणी शाळेत "उमलत्या कळ्या.. " हस्तलिखिताचे प्रकाशन

शालेयवृत्त सेवा
0

 



नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

किनवट तालुक्यातिल लोणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जागतिक महिला दिनानिमित्त शालेय मंत्रिमंडळाने संपादित केलेल्या "उमलत्या कळ्या.. " या हस्तलिखिताचे प्रकाशन ग्रामपंचायत अधिकारी वर्षा कांबळे- वाघमारे यांच्या हस्ते झाले. यावेळी  सरपंच बेबीताई कुरसंगे, उपसरपंच सीमाताई पावडे, उपक्रमशील शिक्षिका विद्या श्रीमेवार, शालेय मंत्रिमंडळातील कु.श्रेया गुंजकर, मंत्रा गुंजकर, पायल वाघमारे आदी उपस्थितीत होते.


         जागतिक महिला दिन सर्वत्र वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करीत आहेत. लोणी शाळेत सुद्धा ग्रामपंचायत पदाधिकारी आणि माता पालक संघाचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत महिलांचा मेळावा घेण्यात आला होता. यावेळी शालेय मंत्रिमंडळाने तयार केलेला हस्तलिखित "उमलत्या कळ्याचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या हस्तलिखितामध्ये वर्तमानपत्रात शाळा, छायांकित शाळा, माझी चित्रकला, माझे हस्ताक्षर, असे विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे विविध विभाग करण्यात आले आहेत.


        यावेळी उपस्थित महिलांनी आपले विचार मांडलेत कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक रमेश मुनेश्वर, पदविधर शिक्षक अंकुश राऊत, तंत्रस्नेही शिक्षक राहुल तामगाडगे,  विद्यार्थी विद्यार्थिनींनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)