हरणमाळ जिल्हा परिषद शाळेत जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न..

शालेयवृत्त सेवा
0

 



नंदुरबार ( शालेय वृत्तसेवा ) :

जागतिक महिला दिनाचे ८ मार्च औचित्य साधून जिल्हा परिषद नंदुरबार प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीमती वंदना वळवी यांच्या आदेशान्वये नवापूर तालुक्यातील श्रावणी केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हरणमाळ याठिकाणी शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने शाळेतील सर्व महिला, पालक आणि विद्यार्थिनी करिता विविध  स्पर्धा आयोजित करून महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुष्पहार करून सुरुवात झाली. गावातील रणरागिणींचा सन्मान शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

    

      शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा चंद्रकला गावीत, ग्रामपंचायत सदस्य कल्पेश गावीत, मुख्याध्यापिका छोटी पाटील, महाराष्ट्र राज्य प्रहार शिक्षक संघटना नंदुरबार जिल्हाध्यक्ष तथा शिक्षक गोपाल गावीत, पालक सदस्य गुजराबाई गावीत, वरुशा गावीत, कौशल्याबाई गावित, अंगणवाडी सेविका भिलकीबाई गावित, रुबजी गावित, किसन गावित, कृष्णा गावीत, रमेश गावित, संजय गावित, अभिषेक गावीत, बुद्या गावित आदी माता-पालक उपस्थित होते. शाळेच्या भौतिक सुविधा बाबत चर्चा करण्यात आली. 


        शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा चंद्रकला गावित यांनी आपल्या मनोगतातून सांगितले, जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देऊन, स्त्री आहे म्हणून हे विश्व आहे. स्त्री आहे म्हणून घराला घरपण आहे. स्त्री आहे म्हणून नात्यात जिवंतपणा आहे. तिचा सन्मान करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. स्त्री म्हणजे वात्सल्य, स्त्री म्हणजे मांगल्य, स्त्री म्हणजे मातृत्व, स्त्री म्हणजे कर्तृत्व, स्त्री म्हणजे प्रत्येक क्षणांची साथ, स्त्री म्हणजे प्रत्येक अडथळ्यांवर मात करत आहे. महाराष्ट्र राज्य प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोपाल गावित यांनी सांगितले की,भारतात महिलांच्या सक्षमीकरणासाठी अनेक उपक्रम राबवले जात आहेत. 


        सरकारने बेटी बचाओ बेटी पढाओ सारखे कार्यक्रम सुरू केले आहेत, मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यावर लक्ष केंद्रित करतात.   याशिवाय, प्रधानमंत्री जनधन योजनेसारखे उपक्रम आहेत, ज्याने महिलांसाठी ३० कोटी बँक खाती उघडली आहेत, आर्थिक समावेशनाला चालना दिली आहे. भारतीय राजकारणातील काही उल्लेखनीय महिलांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.भारतातील महिला मुख्यमंत्र्यांची यादीत सुचेता कृपलानी, भारताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री, नंदिनी सत्पथी, ज्यांनी महिलांचे हक्क आणि ग्रामीण विकासावर लक्ष केंद्रित केले. जयललिता, ज्यांनी तामिळनाडूमध्ये कल्याणकारी योजना आणल्या. मायावती, पहिल्या महिला मुख्यमंत्री, ममता बॅनर्जी, पहिल्या महिला रेल्वे मंत्री म्हूणन कामकाज पहिले. 


         भारतीय राजकारणात स्त्रिया नेतृत्व करू शकतात आणि बदल घडवू शकतात हे दाखवून देत या महिलांनी भावी पिढ्यांसाठी मार्ग मोकळा केला आहे. एकूणच, आंतरराष्ट्रीय महिला दिन हा महिलांच्या कर्तृत्वाचा उत्सव आणि लैंगिक समानतेसाठी सुरू असलेल्या संघर्षाची आठवण करून देणारा आहे. असेही मत व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)