निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत कृती कार्यक्रमावर शिक्षकांनी भर द्यावा- प्राथमिक शिक्षणाधिकारी वंदना वळवी

शालेयवृत्त सेवा
0

 




श्रावणी केंद्रातील खडकी जि. प. शाळा व हरणमाळ शाळेची शिक्षण परिषद उत्साहात संपन्न..               

नंदुरबार ( शालेय वृत्तसेवा ) :

      जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नंदुरबार, जिल्हा परिषद नंदुरबार शिक्षण विभाग तसेच पंचायत समिती नवापूर शिक्षण विभाग यांच्या आदेश नुसार नवापूर तालुक्यातील श्रावणी केंद्रातील जिल्हा परिषद शाळा खडकी व जिल्हा परिषद शाळा हरणमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्रस्तरीय शिक्षण परिषद पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. 


       मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, सरस्वती माता, देवमोगरा माताचे प्रतिमापूजन करण्यात आले. शिक्षण परिषदेला जिल्हा परिषद नंदुरबार शिक्षण विभाग  प्राथमिक शिक्षणाधिकारी वंदना वळवी, शिक्षण विस्तार अधिकारी रमेश गिरी, नवापूर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी रमेश चौरे, श्रावणी केंद्राचे केंद्रप्रमुख महेंद्र नाईक, महाराष्ट्र राज्य प्रहार शिक्षक संघटना नंदुरबार जिल्हाध्यक्ष गोपाल गावित, हरणमाळ शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा चंद्रकला गावीत, खडकी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा प्रीती गावित, देवळीपाडा ग्रामपंचायत सदस्य कल्पेश गावीत, शाळा व्यवस्थापन समिती सदस्या सविता गावित, संगीता गावित, अंजली वाडगी गावित, सदस्य विजय वसावे आदी उपस्थित होते. केंद्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक वृंद आदी उपस्थित होते.

 

           जिल्हा परिषद शाळांमधील मुलांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. आपले मुल काय शिकत आहे, याविषयी पालकांनी जागरूक असणे महत्त्वाचे आहे.  निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत कृती कार्यक्रमावर शिक्षकांनी भर द्यावा. मुलनिहाय नियोजन करून विहित वेळेत कृती कार्यक्रम प्रभावीपणे पार पाडणे, माता पालक गटांची जबाबदारी, शालेय शिक्षकांचे शाळेची गुणवत्ता वाढीसाठी असलेली जबाबदारी, यामध्ये पालकांचा व गावाचा सहभाग देखील महत्त्वपूर्ण आहे, नवी दिल्ली मार्फत सांस्कृतिक स्रोत एवं प्रशिक्षण केंद्र गुवाहाटी आसाम यांच्याकडून गोपाल गावीत सी सी आर टी प्रशिक्षणार्थी यांना देण्यात आलेल्या शिवाजी महाराज यांच्या शौर्याची तसेच गड किल्ल्यांची बुक पोस्टर माहिती, मान्यवरांच्या हस्ते प्रदर्शित करण्यात आले. गडकिल्ल्यांना भेट देणाऱ्या त्यांच्याबरोबर असलेल्या लहान मुलांना तसेच शाळेमधील सहलीला आलेल्या मुलांना तेथील एलिमेंटसची माहिती नसते. तटबंदी म्हणजे काय, बालेकिल्ला कशाला म्हणावे, चिलखती बुरुज कशास म्हणतात. अशा ऐतिहासिक वास्तूची माहिती नसते ती माहिती व्हावी म्हणून ‘गड किल्ल्याचे बुक पोस्टर ’ हे उत्तम गाईडची भूमिका बजावणार आहे. यामधील महत्त्वाचे पैलू उलगडत आगामी पिढीसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. 


           गड किल्ल्यातील एलीमेंटसची सर्व माहिती एकत्र मिळावी हा मुख्य हेतु असल्याचे मत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी वंदना वळवी यांनी केले. त्यानंतर गटशिक्षणाधिकारी रमेश चौरे यांनी मार्गदर्शन करताना निपुण भारत अभियान, अध्ययन निष्पत्ती कृतीकार्यक्रम नियोजन, शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा अंतर्गत पूर्ण झालेल्या मानके यांचा आढावा माहिती दिली. शासनाच्या धोरणानुसार प्रत्येक महिन्यात एक शिक्षण परिषद घेण्यात येते त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या विषायांवरती चर्चा होते. वेगवेगळ्या उपक्रमांवरती चर्चा केली जाते त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास, गुणवत्तापूर्ण शिक्षण, गुणात्मक वाढ करण्यासाठी जे प्रयत्न करण्यात येतात त्याबद्दल या शिक्षण परिषदेमध्ये चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करण्यात येऊन याचा वापर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ते वाढीसाठी होत असतो. यामध्ये वेगवेगळ्या प्रकार प्रकारच्या विषयांवर मार्गदर्शन करण्यात येते. त्याचबरोबर श्रावणी केंद्राचे प्रभारी केंद्रप्रमुख महेंद्र नाईक यांनी या संपूर्ण कार्यक्रमामध्ये शासनाच्या विविध जीआर चे वाचन करून दाखवले त्याचबरोबर वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा घडवून आणून योग्य प्रकारे शिक्षकांना मार्गदर्शन केले. शिक्षकांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या शंकांचे समाधान करण्याचा प्रयत्न शिक्षण परिषद मध्ये केला. 


         मागील शिक्षण परिषदेचा आढावा व गुणवत्तेबाबत चर्चा, जिल्हास्तरावरून देण्यात आलेल्या पीपीटी च्या आधारे मागोवा व गुणवत्तेबाबत आढावा व चर्चा घडवून आणली. शाळा गुणवत्ता मुल्यांकन व आश्वासन आराखडा, केंद्रातील शाळानिहाय आढावा घेऊन व अडचणी असल्यास सुलभन करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. शिक्षण परिषद विषय शंका व प्रश्न निरसन, उपस्थित शिक्षकांचे शंका निरसन करून दिले, प्रशासकीय सूचना केंद्रप्रमुखांनी केंद्राच्या गरजानुरूप आवश्यक त्या प्रशासकीय सूचना देण्यात आल्या. तसेच सुलभक धीरज खैरनार यांनी निपुण महाराष्ट्र अभियान कृती कार्यक्रम (०५ मार्च २०२५) शासन निर्णय पीपीटी च्या आधारे समजून घेऊन शंका निरसन तात्काळ करून घेणे. ग्यानप्रकाश फाउंडेशन जिल्हा समन्वयक क्रांती सोनवणे मॅडम यांनी निपुण महाराष्ट्र अभियान कृती कार्यक्रम केंद्रस्तरीय नियोजन, जिल्हास्तरावरून देण्यात आलेल्या पीपीटी च्या आधारे सुलभकांनी सदर विषय नुसार इयत्ता २ री व ३ ते ५ वी वर्गाचे एकत्रित गटात नियोजन तयार करणे, निपुण महाराष्ट्र अभियान कृती कार्यक्रम अंतर्गत तयार केलेल्या केंद्रस्तरीय नियोजन सादरीकरण, जिल्हास्तरावरून देण्यात आलेल्या पीपीटीनुसार सुलभकांनी सदर विषय सादरीकरण करण्यात आला. ही केंद्रस्तरीय परिषद जि. प. खडकी शाळा, जि. प. हरणमाळ शाळा यांच्या नियोजनातून पार पडली.


         त्याचबरोबर केंद्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक बंधू- भगिनी उपस्थित होते. शिक्षण परिषद यशस्वी करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती खडकी व हरणमाळ शाळेच्या पदाधिकारी तसेच शाळेचे मुख्याध्यापक मालिनी पाडवी छोटी पाटील, शिक्षक बकाराम सूर्यवंशी, महाराष्ट्र राज्य प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा शिक्षक गोपाल गावित, पंकज गावित, हेमलता वळवी आदींनी परिश्रम घेतले. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात नवापूर तालुक्यातील श्रावणी केंद्रातील नवापाडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यांनी तालुका पातळीवर क्रमांक तृतीय मिळवला. शाळेचे मुख्याध्यापक जगदीश कोकणी व सहशिक्षिका अरुणा कोकणी मॅडम यांचा सत्कार केंद्रामार्फत शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. नंदुरबार जिल्हा परिषद क्रीडा व सांस्कृतिक कला महोत्सव मध्ये बक्षीस प्राप्त केल्याबद्दल  श्रावणी केंद्रातील उपक्रमशील शिक्षिका सीमा पाटील, मनिषा कोकणी व शिक्षक धीरज खैरनार यांनीही खेळात बक्षीस मिळवल्याबद्दल शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. सकाळी शाळेतील नवनियुक्त शिक्षक मिलिंद जाधव यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी शिक्षण परिषदेचे सूत्रसंचालन शिक्षक गोपाल गावीत, प्रास्ताविक शिक्षक बकाराम सूर्यवंशी यांनी केले तर खडकी शाळेच्या मुख्याध्यापिका मालिनी पाडवी, व मुख्याध्यापिका छोटी पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)