चंद्रपुर ( शालेय वृत्तसेवा ) :
अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला क्रीडा मंडळ (रजि) महारष्ट्रराज्यचे २ मार्च ला माहूर येथे राज्यस्तरीय कराओके गीत गायन स्पर्धा आयोजित केली होती. राज्यस्तरीय कराओके गीत गायन स्पर्धेत नागपूर विभागातील सातही तारे चमकले आहेत.
६ विभागाचे ४२ स्पर्धक निवडले होते. यात नागपूर विभागातून चंद्रपूर जिल्ह्याचे ७ ही स्पर्धक विजेते होऊन राज्यस्तरीय गीत गायन स्पर्धा साठी पात्र ठरलेले होते. नागपूर विभाग अध्यक्ष नरेन्द्र कन्नाके यांच्या मार्गदर्शनातून भारत सलाम, कुमारी दिक्षा कांबळे, निलेश दोणाडकर, घनश्याम मेश्राम, संतोष कडूकर, कुमारी दिपाली बोहरूपी यांनी अतिशय सुंदर गायन करून माहुर येथील राज्यस्तरीय गीत गायन स्पर्धेत अनेकांची मने जिंकली. स्पर्धा अतिशय चुरशीची होती. झालेल्या राज्य स्पर्धेत नागपूर विभागातून निलेश दोनाडकर उत्तेजनार्थ तर घनश्याम मेश्राम नागपूर विभाग मधून प्रथम करमांकचे मानकरी ठरले.
उद्घाटक मा. श्री. दिलीपकुमार बनसोडे (शिक्षणाधिकारी), अध्यक्ष श्री. नटराज मोरे, परीक्षक श्री. भारत कोडपे (गायन विशारद) श्री. राजू जाधव (संगीत विशारद) श्री. सुरेश पाटील (संगीत विशारद) यांनी अतिशय प्रामाणिक गुणदान करून सखोल परीक्षण केले. आयोजक मराठवाडा विभागीय अध्यक्ष रमेश मुनेश्वर, विभागीय सचिव शेषराव पाटील आणि त्यांची पूर्ण टीम अतिशय मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी केले.
प्रमुख उपस्थिती मधे सौ हर्षल साबळे, श्री. हिराजी कन्नाके, सर्व सहा विभागातील शिक्षक वृंद प्रामुख्याने उपस्थित होते. विजेत्यांना व सहभाग शिक्षकांना सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. शेवटी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .