धुळे / साक्री ( शालेय वृत्तसेवा ) :
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था धुळे, प्राथमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद धुळे तसेच शिक्षण विभाग पंचायत समिती साक्री यांच्या निर्देशान्वये नुकतीच धनेर बीट अंतर्गत येणाऱ्या धनेर, रोहोड, जामखेल, राईनपाडा अशा चार ही केंद्रातील सर्व प्राथमिक शिक्षकांची बीटस्तरीय सहविचार सभा शिक्षण विस्तार अधिकारी श्रीम एस एस भामरे यांच्या अध्यक्षते खाली रोहोड संपन्न झाली. या सहविचार सभेसाठी धनेर बीटा अंतर्गत येणारे चार ही केंद्रा चे केंद्रप्रमुख व प्राथमिक शिक्षक आणि विशेष शिक्षक उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीला केंद्रशाळा धनेर येथील शिक्षिका श्रीम वसावे यांनी बीटाच्या वतीने विस्तार अधिकारी श्रीम भामरे यांचे पुष्प गुच्छ देवून स्वागत केले.
या सभेला धनेर बीट विस्तार अधिकारी श्रीमती एस एस भामरे यांनी मार्गदर्शन करतांना SQUAAF मानके पूर्तता आणि चावडी वाचन याबाबत केंद्रनिहाय विस्तृत आढावा घेत शिक्षकांना येणाऱ्या सर्व अडचणी समजुन घेतल्या तसेच समस्या निराकरणार्थ उपाय सुचवित मार्गदर्शन केले.
तदनंतर विद्यार्थ्यांमध्ये पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान कौशल्य विकसित करण्यासाठी राज्यात निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत कृती कार्यक्रम राबविनेबाबत च्या परिपत्रकाचे सविस्तर वाचन करत मुद्देनिहाय मार्गदर्शन केले आणि सदर कृती कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नियोजन करण्याबाबत आवाहन केले.
तसेच येत्या शैक्षणिक सत्रारंभी पर्यंत एकही विद्यार्थी प्रारंभिक स्तरावर व अप्रगत राहु नये यासाठी सर्वांनी नियोजनपूर्वक विशेष प्रयत्न करण्यावर भर द्यावा असेही त्यांनी सांगितले यासाठी विद्यार्थ्यांचे अध्ययन सुलभ होण्यासाठी शिक्षकांनी सराव साहित्य, जादुई पिटारा यांचा मुबलक वापर करण्या विषयी सुचना देण्यात आल्या.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .