यवतमाळ / पुसद ( प्रतिनिधी ) :
अखिल भारतीय शिक्षक साहित्य, कला क्रीडा मंडळ (रजि) व्दारे शिक्षकांच्या राज्यस्तरीय कराओके गीतगायन महाअंतिम सोहळा श्रीक्षेत्र माहूर येथे संपन्न झाल्या. अमरावती विभागातून पुसदच्या जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका प्रीती शशांक भरणे ह्यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नांदेड जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी दिलीपकुमार बनसोडे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मंडळाचे राज्याध्यक्ष नटराज मोरे, कोकण विभागाचे अध्यक्ष हर्षल साबळे, मराठवाडा विभागाचे अध्यक्ष रमेश मुनेश्वर, सचिव शेषेराव पाटील आदी उपस्थित होते. सदर स्पर्धेला राज्यातून स्पर्धक आले होते. प्रत्येक विभागातून एक विजेता निवडण्यात आले. सर्वांना स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
गोड गळ्याची गायिका कलावंत शिशिका प्रिती भरणे अमरावती विभागातून प्रथम क्रमांक मिळवल्याबदल गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक -शिक्षिकेनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .