नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळा क्र.१२ हैदरबाग येथे मुलींना मोफत सायकल वाटप..

शालेयवृत्त सेवा
0

 



नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका अंतर्गत प्राथमिक व माध्यमिक शाळा क्रमांक 12, हैदर बाग येथे मुलींना मोफत सायकल वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचा उद्देश मुलींना शिक्षणासाठी प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देणे आणि त्यांना शालेय जीवनात अधिक स्वावलंबी बनवणे हा होता.


या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून माननीय शिक्षणाधिकारी व्यंकटेश चौधरी यांची उपस्थिती होती. तसेच संदीप लबडे व संजय ढवळे  यांच्या समन्वयातून कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक राजापटेल अब्दुल मुतल्लीब यांनी विद्यार्थिनींना प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले.


यावेळी शिक्षणाधिकारी व्यंकटेश चौधरी यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, "शिक्षण हा प्रत्येक विद्यार्थ्याचा हक्क आहे. अनेक मुली अंतर दूर असल्याने शिक्षणापासून वंचित राहतात. मोफत सायकल वाटपामुळे त्यांना शाळेत नियमितपणे उपस्थित राहता येईल आणि त्यांच्या शैक्षणिक प्रगतीस मदत होईल. विद्यार्थिनींनी शिक्षणाची कास धरून उज्ज्वल भविष्य घडवावे," असे आवाहन त्यांनी केले.


या उपक्रमामुळे विद्यार्थिनींना शिक्षणासाठी प्रवास करणे सुलभ होणार असून, त्यांच्या शैक्षणिक प्रगतीस मोठी मदत मिळेल. पालक आणि विद्यार्थिनींनी या उपक्रमाचे मनःपूर्वक स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाजीया तबस्सूम यांनी केलं व या कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षिका महेजबीन बेगम व निखत परवीन यांनी खूप प्रयत्न केले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)