मेघना कावली यांची नांदेड जिपच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती

शालेयवृत्त सेवा
0

 


नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

         2020 बॅचच्या SOCIOLOGY  हा विषय घेवून 83 वी RANK घेवून IAS झालेल्या  किनवटच्या विद्यमान  सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कावली यांची शासनाने जिल्हा परिषद, नांदेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती केली आहे.

    

      मेघना कावली हया मुळच्या तेलंगणा राज्यातील मारपल्ली मंडल बशिराबाद जिल्हा विकराबाद येथील मुळ रहिवाशी असुन हैद्राबाद निवासी आहेत. त्यांचे वडील रामलू हे व्यवसायाने डॉक्टर आहेत तर आई सुजाता ह्या गृहणी आहेत. त्यांचे पती रविकुमार हे सुध्दा भारतीय प्रशासनिक अधिकारी (IAS) आहेत. मेघना कावली हया मुळच्या इंजिनिअर असून यांनी Electrical Engineering मध्ये B.Tech पदवी संपादणूक केली असून IIM लखनौ येथून याच विषयात पदवीव्युत्तर M.Tech चे शिक्षण घेतलेले आहे. भारतीय प्रशासनिक सेवेत येण्यापूर्वी त्या Assistant Marketing Manager ITC, Bangalore या पदावर कार्यरत होत्या. सध्या त्या किनवट येथे  सहाय्यक जिल्हाधिकारी पदावर कार्यरत होत्या.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)