गोविंदेश्वर प्राथमिक शाळेत जागतिक महिला दिनानिमित्त माता पालक संघाचा सन्मान सोहळा

शालेयवृत्त सेवा
0


नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

आज दि . 8 मार्च 2025 जागतिक महिला दिना निमित्त गोविंदेश्वर प्रा. शाळा तरोडा बु नांदेड. येथे माता पालक महिलांचा सन्मान सोहळा आयोजीत करण्यात आला. राजमाता जिजाऊ व क्रांती ज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेस अभिवाद करण्यात आले.निपूण भारत अभियाना अंतर्गत निपूण प्रतिज्ञा घेण्यात आली इयत्ता पाहिली ते सातवीच्या च्या सर्व विद्यार्थ्याच्या मातांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष महिला शिक्षिका सौ. संध्या सिंदगीकर होते. त्याच बरोबर माता पालक संघांचे सर्व महिला पदाधिकारी सौ. सविता लिंगायत सीमा गायकवाड सुरेखा इंगोले सविता आंबटवार रमावती बघेल अनुसया मोरे जनाबाई देवकते शिल्पा बसवंते सोनाली आंबटवार या महिला भगिनी  उपस्थित होत्या.


      शाळा परिसरातील माता भागिनींचा सहभाग अत्यंत आनंददायी व प्रेरणादायी होता.महिला दिना  निमित्त महिलांचे रंजक चर्चा सत्र आयोजीत करण्यात आले सर्व माता भगिनींनी चर्चा सत्रात उत्साहाने सहभाग नोंदवला. यानंतर अल्पउपहार देण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री सचिन दिग्रसकर यांनी केले. तर सुत्रसंचलन श्री सूर्यकांत जाधव यांनी केले.तर आभार प्रदर्शन सौ किडे शोभा यांनी केले.तसेच या कार्यक्रमास मोरे सुग्रीव आणि दिगंबर कल्याणकर यांनी परिश्रम घेतले.शाळेचे सर्व विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)