प्रा.शा.शेंबोलीत भरवले शाळास्तरीय विज्ञान प्रदर्शन

शालेयवृत्त सेवा
0



नांदेड / मुदखेड ( शालेय वृत्तसेवा ) :

     राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्यसाधून प्रा.शा.शेंबोली ता.मुदखेड येथे शाळास्तरीय विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आले. विषयतज्ज्ञ श्री गजानन लाडकेकर पंचायत समिती मुदखेड यांच्या हस्ते थोर भारतीय शास्त्रज्ञ सी.व्ही.रमण यांच्या प्रतिमेचे पूजन करुन प्रदर्शनाचे उद्घटन केंद्रप्रमुख बारड अरुण अतनुरे यांनी केले यावेळी श्री रामकृष्ण लोखंडे  यांनी प्रास्तविक केले.

 

     वैज्ञानिक दृष्टीकोन म्हणजेच कार्यकारणभाव तपासणे.प्रत्येक  कार्याच्या मागे कारण असते ते कारण आपल्या बुध्दीला समजू शकतं पण जगातल्या सगळ्याच कार्याच्या मागची कारणे समजतात असे नाही पण ती ज्यावेळी समजातील  कार्यकारणभावामूळेचं.हा ज्ञान प्राप्तीचा मानसाला लाभलेला सर्वात खात्रीचा मार्ग होय.


         एखादी गोष्ट सत्य आहे की नाही यासाठी वैज्ञानिक दृष्टीकोनातून निरीक्षण, तर्क, अनुमान, प्रचिती आणि प्रयोग या मार्गांनी ज्ञान आत्मसात करण्याची विज्ञानाची पध्दत आहे. आणि म्हणूनच विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण व्हावा त्याच्यामध्ये रुजवावा यासाठी या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.


      यामध्ये इयत्ता 1ली  ते  8 वी च्या विद्यार्थ्यांनी विविध प्रयोग सादर केले.मेघराज व समैक हॅड्रॉलिक JCB, वैष्णवी , प्रथमेश गाव शहर,विनोद कार्तिक जहाज,कुलर, मिक्सर, रहेमान,कार्तिक ज्वलामुखी, शिवप्रसाद,राधाकिशन पाणी आडवा पाणी जिरवा, रुद्र वाटर फिल्टर, सायली ,अक्षरा पाण्याची घनता,प्रतिक्षा डुकरे हवेचा दाब, हिंदवी, स्नेहल सौरऊर्जा, राहुल पंदिलवाड पवण चक्की,सिद्धेश्वरी, अन्विता जलशुध्दीकरण,असे अनेक लहान मोठे प्रयोग विद्यार्थ्यांनी सादर केले या विद्यार्थ्यांना विज्ञान विषयात शिक्षिका सुनिता केंद्रे यांनी मार्गदर्शन केले.


       यावेळी केंद्रप्रमुख अरुण अतनुरे, श्री गजानन लाडकेकर सर,शिक्षक रामकृष्ण लोखंडे, मंगला महाजन, सुनिता केंद्रे, जयश्री गायकवाड, संगीता वादळे,गोविंद गोरेवाड, इत्यादी गावकरी व विद्यार्थी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)