पहिलीच्या पाठ्यपुस्तकांची निर्मिती अंतिम टप्प्यात; पडताळणी सुरू.. पाठ्यपुस्तके 'एनईपी'च्या धर्तीवर करण्याचे प्रस्तावित; तरी पुस्तकाला अंतिम स्वरूप !

शालेयवृत्त सेवा
0



पुणे ( शालेय वृत्तसेवा )  : 

नवीन शैक्षणिक धोरणाच्या (एनईपी ) धर्तीवर पाठ्यपुस्तके तयार करून शाळा सुरू होण्यापूर्वी ती विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून पाठ्यपुस्तके 'एनईपी'च्या धर्तीवर टप्प्याटप्प्याने तयार करून घेण्याचे प्रस्तावित असताना अद्याप पहिलीच्या पुस्तकाला अंतिम स्वरूप देण्यात आले नाही. त्यामुळे शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तके उपलब्ध होण्याबाबत साशंकता असल्याची शिक्षण क्षेत्रात चर्चा आहे.


१ ली इयत्ताच्या विद्यार्थ्यांना वेळेत पाठ्यपुस्तक मिळणार का?


पहिली ते बारावीच्या कोणत्याही पुस्तकांची निर्मिती प्रक्रिया अद्याप सुरू नसून, जुन्या एकात्मिक पाठ्यपुस्तकांच्या इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना वह्यांच्या पानांशिवाय विषयनिहाय नियमित पाठ्यपुस्तके नव्याने प्रकाशित करून उपलब्ध करून देण्यात असलेल्या साठ्याचे करायचे असे असणार काय, याबाबतही ठोस नियोजन निर्णय झालेला नाही. त्यामुळे बाजारातील विक्रेत्यांमध्ये संभ्रम आहे. या सर्व परिस्थितीत यंदा विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी पाठ्यपुस्तके उपलब्ध होऊ न शकल्यास त्याची आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीची जबाबदारी कुणाची ?, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. मात्र, याबाबत नियोजन केले असल्याचे बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील यांनी स्पष्ट केले. येणार आहेत, तसेच दुसरी ते आठवीची पूर्वीप्रमाणे नियमित विषयनिहाय पाठ्यपुस्तके शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये उपलब्ध करून देण्यात येतील.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)