छत्रपती संभाजीनगर ( शालेय वृत्तसेवा ) :
अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला क्रीडा मंडळ (रजि) छत्रपती संभाजीनगर शाखेची कार्यकारणीसाठी नुकतीच एक बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्ह्याध्यक्षपदी किरण शंकराव गाडेकर तर सचिवपदी सिराज नसीर पठाण यांची निवड करण्यात आली. बैठकिच्या अध्यक्षस्थानी मराठवाडा विभागीय अध्यक्ष रमेश मुनेश्वर होते.
किरण गाडेकर हे पैठण तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक इसारवाडी शाळेत सहशिक्षक आहेत. ते एक सर्वगुणसंपन्न अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून परिचित आहे. उत्कृष्ट बासरी वादक, हार्मोनियम वादक, बुलबुल तरंग वादक, उत्कृष्ट फलक लेखनकार, कॅलिग्राफी लेखक, गज़लकार, ऊर्दू भाषेचे विशेष जाणकार, नावाजलेले कथाकथनकार, अतिउकृष्ट निवेदक आहेत. विशेष म्हणजे मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या सभेत निवेदनाचा अनुभव त्यांना मिळाला.
जिल्हा सचिवपदी निवड झालेले सिराज पठाण हे पैठण तालुक्यातील जिल्हा परिषद प्रशाला ढोरकीन येथे सहशिक्षक पदावर कार्यरत आहेत. 2011 च्या इंडियन आयडॉलची पात्रता फेरी त्यांनी गाठली होती. नुकत्याच श्रीक्षेत्र माहूर येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय महाराष्ट्राचा शिक्षक महागायक 2025 या किताबचे ते उपविजेते असुन त्यांनाही वाचन, गायन, सुत्रसंचलनाची आवड आहे. उर्वरीत जिल्हा कार्यकारणी निवड करण्याचे अधिकार त्यांना देण्यात आले आहेत.
त्यांच्या निवडी बद्दल संस्थापक तथा राज्याध्यक्ष नटराज मोरे, उपाध्यक्ष शालिनी मेखा, राज्य सचिव हर्षल साबळे, राज्य प्रसिद्धी प्रमुख सचिन कुसनाळे, मराठवाडा विभागीय उपाध्यक्ष बिभिषण पाटील, विभागीय सचिव शेषेराव पाटील आणि छ. संभाजीनगरच्या शिक्षक मित्र आदिनी अभिनंदन केले आहे.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .