वडगाव जिल्हा परिषद शाळेतील दोन विद्यार्थी NMMS परीक्षेत उत्तीर्ण

शालेयवृत्त सेवा
0

 



गावकऱ्यांकडून शाळेचे कौतुक

नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

      अक्षर परिवारातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वडगाव (ता. नांदेड) या शाळेतील इयत्ता आठवी वर्गात शिकणारे दोन विद्यार्थी एन एम एम एस या 2024-25 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाले आहेत. सदरील विद्यार्थी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव येथे शिकत असून आनंद ज्ञानेश्वर पुयड आणि प्रथमेश संदीप पुयड या दोन विद्यार्थ्यांनी एन एम एम एस परीक्षा मध्ये यश प्राप्त केले आहे.


       एन एम एम एस परीक्षा म्हणजे राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा आहे. ही परीक्षा राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी घेतली जाणारी शिष्यवृत्ती परीक्षा आहे. या परीक्षेत यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांना वार्षिक 12000 एवढी शिष्यवृत्ती सलग चार वर्षे म्हणजे आठवी ते बारावी पर्यंत एकूण 48 हजार रुपये मिळते. 


        अतिशय ग्रामीण भागात शिकणाऱ्या आणि कुठल्याही प्रकारचे खाजगी क्लासेस न लावता जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सदरील परीक्षेची तयारी करून या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे. या विद्यार्थ्यांच्या यशामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगावचे मुख्याध्यापक माधव कल्हाळे, वर्गशिक्षक मारुती पाटील, पदवीधर शिक्षक जगजित सिंह ठाकुर, शिवलिंग दमयावर, सौ मुळे, सौ. जयश्री शिंदे, सौ. पौर्णिमा अंकमवार, श्रीराम मोगले, सौ. लता उदबूके,  सौ. काटकर  या शिक्षकांनी परिश्रम घेऊन शाळेच्या वेळेच्या व्यतिरिक्त अतिरिक्त तासिका घेऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच शाळेतील शिक्षिका सौ. जयश्री शिंदे  यांनी स्वखर्चाने NMMS च्या अभ्यासक्रमाची पुस्तके खरेदी करून शाळेतील मुलांना मोफत पुरवली. कारण zp शाळेतील मुलांची पुस्तके विकत घेण्याची सुध्दा ऐपत नसते, पण मुलातील टॅलेंट ओळखून सौ शिंदे यांनी केलेल्या मदतीनं मुले अभ्यासासाठी पुढे सरसावली आणि यश प्राप्त केलं. तसेच व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप पाटील पुयड यांनी सुद्धा खूप मोलाचे सहकार्य केले.


      विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल गावातून अभिनंदन करण्यात येत आहे. सदरील शाळेला बीटचे ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी तथा नांदेडचे शिक्षणाधिकारी (मनपा) व्यंकटेश चौधरी आणि केंद्रप्रमुख व्यंकट गंदपवाड यांनी विशेष कौतुक केले.


       बारावीपर्यंत शिक्षणासाठी आर्थिक दुर्बल घटकातील मुलांना या शिष्यवृत्तीचा निश्चित फायदा होणार आहे आणि ग्रामीण भागातून असे विद्यार्थी पुढे आले तर नक्कीच ग्रामीण भागातील टॅलेंट अशा परीक्षेच्या माध्यमातून समोर आणण्यासाठी जिल्हा परिषद शाळांची ही धडपड ही मेहनत नक्कीच वाखानण्याजोगी आहे, असे मत शिक्षणाधिकारी मनपा व्यंकटेश चौधरी यांनी व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)