मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमाची राज्यभरात रेलचेल.

शालेयवृत्त सेवा
0

 



मुंबई ( विशेष प्रतिनिधी उदय नरे) :

आज सकाळपासून व्हाट्सअपवर मराठी शुभेच्छाचे मेसेज येत आहेत.मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छाची   गर्दी झाली आहे. राज्य मराठी दिनाच्या व मराठी भाषेचे गोडे गाणारे कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहेत.शाळा शाळांमध्ये मराठी दिनाचे कार्यक्रम मोठा उत्साहात पार पाडत आहेत.१ मे रोजी ‘मराठी राजभाषा दिन’, २१ फेब्रुवारीला ‘जागतिक मातृभाषा दिन’ आणि २७ फेब्रुवारीला ‘मराठी भाषा गौरव दिन’ हे तीन वेगवेगळे दिवस आहेत हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.


मराठी भाषेला फार मोठी जूनी परंपरा, संस्कृती आणि वारसा आहे. तशीच मराठी भाषेतील साहित्य परंपरा तेवढीच थोर आणि मोठी आहे. 


ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज उर्फ श्री  विष्णू वामन शिरवाडकर यांच्या जन्म दिवसानिमित्त २७ फेब्रुवारीला मराठी भाषा गौरवदिन साजरा केला जातो. पण काही लोक याला मराठी राजभाषा दिन म्हणतात. पण मराठी राजभाषा दिन १ मे आहे. या दोन्ही दिवसांत नेमका फरक आहे.


प्रसिद्ध मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस म्हणजेच २७ फेब्रुवारी हा दिवस 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा केला जातो. त्यांनी मराठी भाषेसाठी मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या या कार्याचा सन्मान करण्यासाठी आणि मराठी भाषेचे महत्व अधोरेखित करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. 


मराठी राजभाषा दिन किंवा मराठी भाषा दिन हा 1 मे रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली, आणि मराठी भाषिकांचे राज्य अस्तित्वात आल्यामुळे हा १ मे रोजी 'मराठी राजभाषा दिन' म्हणून सन १९६५ पासून अधिकृतपणे साजरा केला जातो.

आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन दर वर्षी फेब्रुवारी २१ साजरा केला जातो. १७ नोव्हेंबर १९९९ ला युनेस्को ने हा दिवस "आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन" म्हणून जाहीर केला.


भारत बहुभाषिक आहे- भारत हा विविध संस्कृतींचा आणि वेगवेगळ्या भाषांचा देश आहे. १९६१ च्या जनगणनेनुसार, भारतात १६५२ भाषा बोलल्या जातात. तथापि, एका अहवालानुसार, सध्या भारतात १३६५ मातृभाषा आहेत, ज्यांचे प्रादेशिक आधार वेगवेगळे आहेत. हिंदी ही दुसरी सर्वात लोकप्रिय मातृभाषा आहे. देशात ४३ कोटी लोक हिंदी बोलतात, त्यापैकी १२ टक्के लोक द्विभाषिक आहेत.


देवगिरीच्या यादवांचा काळात मराठी भाषा व संस्कृतीची भरभराट झाली. मराठी ही भाषा देवनागरी लिपी मधुन लिहिली ज़ाते. इ.स. १२७८ मध्ये म्हाइंभट यांनी लीळा चरित्र लिहिले. त्यानंतर इ.स. १२९० मध्ये ज्ञानेश्वरी या ग्रंथाची रचना ज्ञानेश्वरांनी केली. महानुभाव संप्रदायाने मराठी साहित्यात मौलिक भर घातली. संत एकनाथ यांनी या भाषेत भारुडे लिहिली आणि एकनाथी भागवत, भावार्थ रामायण आदि ग्रंथांची भर घातली.


शिवाजी महाराजांनी मराठी साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली आणि पेशव्यांनी या साम्राज्याच़ा विस्तार केला. त्यानंतर मराठी भाषेस राजाश्रय मिळाला. इ.स. १९४७ नंतर स्वतंत्र भारत देशाने मराठीला अधिकृत राज्यभाषेचा दर्जा दिला. इ.स. १९६० मध्ये मराठी भाषिकांचा एकसंध महाराष्ट्र राज्यास मान्यता मिळाली आणि मराठीस राजभाषेचा मुकुट प्राप्त झाला. 



मराठी भाषेला २६ जानेवारी, १९६५ पासून महाराष्ट्र राज्याची राजभाषा म्हणून मान्यता मिळाली आहे. तसेच, ३ ऑक्टोबर, २०२४ रोजी केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी महाराष्ट्र शासनाने प्रयत्न केले होते. यासाठी रंगनाथ पठारे यांच्या नेतृत्वाखाली एक समिती नेमण्यात आली होती. ही समिती ५०० पानांचा अहवाल भारतीय केंद्र सरकारकडे सादर केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राची राज्यभाषा मराठी ला मान्यता देण्याचं घोषणा केली व मराठी माणसाचा उर अभिमानाने भरला. नव्या  शैक्षणिक धोरणातही मातृभाषेला महत्त्व दिले कारण मातृभाषेत  झालेले शिक्षण हेच लवकर आत्मसात होते "महाराष्ट्रियन "महाराष्ट्रातील  मराठी लोकांची मातृभाषा मराठी आहे. भाषा व्यक्तिमत्व घडवते.


आज मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने शाळा, महाविद्यालय, सामाजिक, सांस्कृतिक मंडळांतर्फे अनेक मराठी साहित्य,  संस्कृती यामध्ये मराठी खाद्य, नाटय, साहित्य व खास मराठी वेशभूषा याच्या अनोख्या रुपाची मेजवानी हंसराज मोरारजी  पब्लिक स्कूल अंधेरी मुंबईतील शाळेत पहावयास मिळाली.मराठी भाषा शिक्षक श्री.जितेंद्र महाजन,श्रीमती संजीवनी नारकर व श्रीमती गायत्री बोरिडकर यांनी मराठी दिनाचे उत्कृष्ट आयोजन केले होते.  शाळेचे मुख्याध्यापक श्री गोविंदराजन श्रीनिवासन यांनी  मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या विविध स्पर्धेत पुरस्कार प्राप्तझालेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन सन्मानित केले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)