शिक्षक दरबारात तातडीने निर्णय – शिक्षकांच्या समस्यांवर जलदगती उपाय!

शालेयवृत्त सेवा
0

 


शिक्षक दरबारात निर्णय – शिक्षकांच्या समस्यांवर जलदगतीने उपाय !



 शिक्षकांच्या प्रयत्नांना यश – शिक्षकांच्या  समस्या सुटणार!

मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे)

मा.ना.श्री. उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतून दर सोमवारी शिक्षकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी 'बाळासाहेब भवन', मुंबई येथे शिक्षक दरबाराचे आयोजन केले जाते.

शिक्षणमंत्री .श्री. दादाजी भुसे  यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षक दरबारात विविध समस्यांवर सखोल चर्चा झाली. चर्चेनंतर मंत्री महोदयांनी तातडीने निर्णय घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचनांचे 'रिमार्क' दिले.

या दरबारात शिक्षक सेनेच्या शिष्टमंडळाने विविध महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर शिक्षणमंत्री मा.ना. दादाजी भुसे साहेबांसोबत चर्चा केली. चर्चेनंतर तातडीची कार्यवाही करण्याच्या सूचना मंत्री महोदयांनी दिल्या.

🔹 महत्त्वाचे निर्णय व चर्चा झालेले मुद्दे –

✅ पालघर जिल्ह्यातील PECS अंतर्गत कंत्राटी शिक्षक भरती

✅ आंतरजिल्हा बदली पात्र शिक्षक व विकल्प विपरीत शिक्षकांची कार्यमुक्ती

✅ ठाणे जिल्ह्यात अवघड क्षेत्रातील सेवेला ग्राह्य धरणे

✅ जिल्हा अंतर्गत बदलीसाठी निश्चित तारीख ३१ मे ऐवजी ३० जून करणे

✅ पवित्र पोर्टल भरतीपूर्वी आंतरजिल्हा बदलीचा पुढील टप्पा राबवणे

✅ विशेष संवर्ग भाग-१ मध्ये घटकांचा समावेश करणे

✅ स्व-जिल्ह्यात किंवा जोडीदाराच्या जिल्ह्यात जाण्याची संधी मिळावी यासाठी पुनर्विचार

🔹 शिक्षकांसाठी आणखी महत्त्वाचे मुद्दे:

मुख्यालयी राहण्याच्या सक्तीच्या अटीतून सुटका

 शिक्षण सेवक पद्धती बंद करणे किंवा कालावधी कमी करणे.,वस्तीशाळा शिक्षकांची मूळ सेवा दिनांक ग्राह्य धरणे,

शिक्षकांसाठी कॅशलेस आरोग्य योजना सुरू करणे,

अशैक्षणिक कामांचा बोजा कमी करणे.

मंत्री महोदयांनी शिक्षक सेनेच्या शिष्टमंडळास आश्वासन दिले की, येत्या काळात शिक्षकांच्या हितासाठी सकारात्मक निर्णय घेतले जातील.

शिक्षक सेनेच्या नेतृत्वाखाली शिक्षकांच्या हक्कासाठी निर्णायक लढा!

या महत्वपूर्ण चर्चेसाठी उपस्थित मान्यवर उपस्थीत होते.

मा.आ. श्रीमती मनिषाताई कायंदे (शिक्षक सेनेच्या मार्गदर्शिका, विधान परिषद सदस्या)

श्री. शिवाजीराव शेंडगे (राज्य कार्याध्यक्ष, शिक्षक सेना)

श्री. संभाजीराव शिरसाट (शिक्षक सेनेचे खंबीर नेतृत्व)

श्री. किशोरदादा दिनकर (राज्य कार्यालयीन चिटणीस)

श्री. ज्ञानदेव हांडे (राज्य समन्वयक)  या मान्यवर शिक्षक शिक्षक प्रतिनिधी शिक्षक दरबाराचे उत्कृष्ट असे आयोजन केले होते. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे लवकरच शाळेतील शिक्षकांच्या  संदर्भात सकारात्मक निर्णय घेतील असे उपस्थित असलेल्या शिक्षक वर्गाने आपली प्रतिक्रिया आमच्या प्रतिनिधीशी व्यक्त केली.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)