मुंबई ( विशेष प्रतिनिधी उदय नरे) :
महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आपला पदभार स्वीकारताच आपल्या शैक्षणिक धोरणाची चुणूक दाखवली होती . पदभार स्वीकारत असताना त्यांनी आपल्याबरोबर मंत्रालयात पन्नास हून अधिक विद्यार्थ्यांची फौज मंत्रालयात आणली होती. ग्रामीण भागातील विद्यार्थी असूनही आपल्या बुद्धी कौशल्यावर व शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली अतुलनीय विद्वत्ता प्राप्त असलेल्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आपल्या शिक्षण विभागाचा पदभार एका अनोख्या रूपात स्वीकारला होता . आपल्या शिक्षण विभागातील, मंत्रालयातील अधिकाऱ्यांसह शिक्षण निरीक्षक,उपनिरीक्षक व शिक्षण अधिकारी यांची पत्रकार परिषदेनंतर बैठक घेऊन पहिल्याच दिवशी पाठ घेतला. नव्या शैक्षणिक धोरण संदर्भात नव्या मंत्रानी उचललेली पावले व त्याचे प्रचिती म्हणजे शालेय शिक्षण विभागाने राज्यात आयोजित केलेले नव्या शैक्षणिक धोरणाचे शिक्षकांसाठी आयोजित केलेले प्रशिक्षण.
शिक्षण प्रणालीमध्ये धोरण ठरवताना त्यात आमूलाग्र बदल करण्यासाठी चांगले कार्य करणाऱ्या शिक्षण संस्था, शिक्षक, शिक्षणतज्ज्ञ यांची यादी तयार करण्यात आली आहे. त्यांना प्रत्यक्ष भेटून, त्यांच्या संस्थांची पाहणी करून, संवाद साधून, वास्तविकतेवर आधारित राज्यव्यापी धोरण ठरवण्याचा मनोदय असल्याचे प्रतिपादन राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी नुकतेच केले. आमचे मंत्रालय प्रतिनिधी उदय नरे यांनी यावेळी त्यांच्याशी संवाद साधला होता.
नवे शिक्षण धोरण, २०२० (एनईपी) शिक्षणात मोठ्या प्रमाणात परिवर्तन घडवून आणण्याची कल्पना करते -"भारतीय नीतिमत्तेत रुजलेली शिक्षण प्रणाली जी सर्वांना उच्च दर्जाचे शिक्षण देऊन भारताला, म्हणजेच देशाला शाश्वतपणे समतापूर्ण आणि चैतन्यशील ज्ञान समाजात रूपांतरित करण्यास थेट योगदान देते, ज्यामुळे भारत जागतिक ज्ञान महासत्ता बनतो." एनईपी २०२० प्रवेश, समता, गुणवत्ता, परवडणारीता आणि जबाबदारी या पाच मार्गदर्शक स्तंभांवर आधारित आहे. ते आपल्या तरुणांना वर्तमान आणि भविष्यातील विविध राष्ट्रीय आणि जागतिक आव्हानांना तोंड देण्यासाठी तयार करेल. आणि विद्यार्थी घडवण्याचे काम शिक्षक करतात आणि यासाठी शिक्षकांना योग्य ते प्रशिक्षण मिळाले पाहिजे यासाठी शालेय शिक्षण विभागाने राज्यांमध्ये शिक्षकांसाठी प्रशिक्षण आयोजित केलेले आहे. अंधेरी पश्चिम येथील सेट कॅथरीन शाळेत अशाच एका प्रशिक्षणाला आमच्या प्रतिनिधी भेट दिली. शिक्षण निरीक्षक संजय जावीर यांनी मुंबई उपनगर मध्ये उत्कृष्टपणे या प्रशिक्षणाचे आयोजन केले . विषय साधन व्यक्ती श्रीमती अनिता मोरे आणि विवेक विद्यालयाचे प्राध्यापक श्री विजयकुमार कुमावत हे प्रशिक्षणार्थ्यांना उत्कृष्ट प्रकारे नव्या शैक्षणिक धोरणाचे ध्येय व उद्दिष्ट यांची संकल्पना स्पष्ट करत होते. शंभरापेक्षा अधिक शाळांचे शिक्षक, मुख्याध्यापक व पर्यवेक्षक या प्रशिक्षणाचा आस्वाद घेत होते.
राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० या मूलभूत मूल्यांवर आणि तत्त्वावर भर देते की शिक्षणाने केवळ संज्ञानात्मक कौशल्ये विकसित केली पाहिजेत, म्हणजेच - साक्षरता आणि संख्याशास्त्राची 'मूलभूत कौशल्ये' आणि समीक्षात्मक विचारसरणी आणि समस्या सोडवणे यासारखी 'उच्च दर्जाची' कौशल्ये - परंतु सामाजिक आणि भावनिक कौशल्ये देखील - ज्यांना 'सॉफ्ट स्किल्स' असेही म्हणतात - ज्यामध्ये सांस्कृतिक जागरूकता आणि सहानुभूती, चिकाटी आणि धैर्य, सांघिक कार्य , नेतृत्व, संवाद इत्यादींचा समावेश आहे. धोरणाचे उद्दिष्ट आणि आकांक्षा पूर्व-प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण करण्याचे आहे.
शालेय शिक्षणाच्या सर्व स्तरांवर अनेक सुधारणांची शिफारस नवे शैक्षणिक धोरण करते. ज्यामध्ये शाळांची गुणवत्ता सुनिश्चित करणे, ३-१८ वयोगटातील मुलांना समाविष्ट करणाऱ्या ५+३+३+४ डिझाइनसह अध्यापनशास्त्रासह अभ्यासक्रमात परिवर्तन, सध्याच्या परीक्षा आणि मूल्यांकन प्रणालीमध्ये सुधारणा, शिक्षक प्रशिक्षण मजबूत करणे आणि शिक्षण नियामक चौकटीची पुनर्रचना करणे यांचा समावेश आहे. शिक्षणात सार्वजनिक गुंतवणूक वाढवणे, तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे आणि व्यावसायिक आणि प्रौढ शिक्षणावर लक्ष केंद्रित करणे, यासह इतर गोष्टींचा प्रयत्न यात आहे.
२१ व्या शतकातील शिक्षणाच्या महत्त्वाकांक्षी उद्दिष्टांशी तसेच भारताच्या परंपरा, संस्कृती आणि मूल्यव्यवस्थेशी सुसंगत अशी एक नवीन प्रणाली तयार करण्यासाठी शालेय नियमन आणि प्रशासनासह शिक्षण संरचनेच्या सर्व पैलूंमध्ये सुधारणा आणि सुधारणा करण्याचा प्रस्ताव आहे. ऊर्जावान पाठ्यपुस्तके, शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या क्षमता वाढीसाठी उच्च दर्जाचे ई-सामग्री, शिक्षण परिणामांवर आधारित प्रश्न बँक इत्यादींसह अनेक विद्यमान तसेच प्रस्तावित उपक्रमांद्वारे तंत्रज्ञान शिक्षणाशी एकत्रित केले जाईल.
धोरणात शालेय शिक्षणाच्या सर्व टप्प्यांवर दर्जेदार शिक्षणावर भर देण्यात आला आहे. दर्जेदार शिक्षण हे केवळ जीवन बदलणारे नाही तर एक मानसिकता आणि चारित्र्य निर्माण करणारा अनुभव देखील आहे, जो नागरिकत्वावर सकारात्मक परिणाम करतो. सक्षम विद्यार्थी केवळ देशाच्या वाढत्या विकासात्मक गरजांमध्ये योगदान देत नाहीत तर एक न्याय आणि समतापूर्ण समाज निर्माण करण्यात देखील सहभागी होतात.असे मत हंसराज मोरारजी पब्लिक स्कूल या शाळेच्या शिक्षिका दीपिका जैन यांनी व्यक्त केले. वरिष्ठ क्रीडाशिक्षक श्री विजय अवसरमोल यांच्या मते नवे शैक्षणिक धोरण केवळ विद्यार्थी हा साक्षर न होता एक जबाबदार देश प्रेमी सजग नागरिक तयार होईल याची खबरदारी या धोरणात व्यक्त झाली आहे असे मत मांडले. महाराष्ट्र राज्य हे शिक्षणात नेहमीच अग्रेसर राहिले यामुळेच नव्या शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणी महाराष्ट्र सरकार यांनी जी पावले उचलली आहेत याचा फायदा नव्या पिढीला नक्कीच होईल असे मत प्राचार्य गोविंदराजन श्रीनिवासन यांनी व्यक्त केले
राष्ट्रीय शिक्षण धोरण, २०२०
राष्ट्रीय शिक्षण धोरण, २०२० (एनईपी) शिक्षणात मोठ्या प्रमाणात परिवर्तन घडवून आणण्याची कल्पना करते - "भारतीय नीतिमत्तेत रुजलेली शिक्षण प्रणाली जी सर्वांना उच्च दर्जाचे शिक्षण देऊन भारताला, म्हणजेच देशाला , शाश्वतपणे समतापूर्ण आणि चैतन्यशील ज्ञान समाजात रूपांतरित करण्यास थेट योगदान देते, ज्यामुळे भारत जागतिक ज्ञान महासत्ता बनण्यासाठी मदत करेल नवे शैक्षणिक धोरण हे प्रवेश, समता, गुणवत्ता, परवडणारीता आणि जबाबदारी या पाच मार्गदर्शक स्तंभांवर आधारित आहे. ते आपल्या तरुणांना वर्तमान आणि भविष्यातील विविध राष्ट्रीय आणि जागतिक आव्हानांना तोंड देण्यासाठी तयार करेल.
शालेय शिक्षण विभागाकडून सुरू असलेल्या या प्रशिक्षणासाठी मुंबई विभागाचे शिक्षण उपसंचालक संदीप संगवे,शिक्षण निरीक्षक संजय जावीर वॉर्डनिहाय समन्वयक श्रीम. कोमल शेवाळे विषय साधनव्यक्ती श्रीमती सविता आंधळे,श्रीमती अनिता मोरे, श्रीमती वैशाली पुकळे,श्रीमती.करुणा शिंदे श्रीमती. संगीता थोरात व शिक्षण विभागाचे अधिकारी व कर्मचारी प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी व नव्या भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी कार्यशील आहेत.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .