शालांत परीक्षेत बसलेल्या विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण मंत्र्यांच्या विशेष शुभेच्छा!

शालेयवृत्त सेवा
0

 


 मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे ) :

शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी उद्या २१ फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तणाव न घेता आत्मविश्वास व सकारात्मक दृष्टीकोन ठेवून परीक्षा देण्याचे त्यांनी आवाहन केले आहे. या परीक्षेसाठी राज्यभरातील १६ लाख ११ हजार ६१० विद्यार्थी ५ हजार १३० केंद्रांवर परीक्षेला सामोरे जात आहेत. सर्व विद्यार्थ्यांनी शांत मनाने, नीट तयारी करून आत्मविश्वासाने परीक्षा द्यावी - असे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी म्हटले आहे.


महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक  शिक्षण मंडळाच्या दहावीच्या लेखी परीक्षेला शुक्रवार दिनांक 21 रोजी  सुरुवात होत  आहे. या परीक्षेसाठी राज्यातील सरकारी, अनुदानित आणि खासगी व्यवस्थापनाच्या २३ हजारांहून अधिक शाळांनी  तयारी केली आहे.  परीक्षा मंडळाने  कॉपीमुक्त आणि आनंददायी वातावरणात परीक्षा पूर्ण  व्हावी, यासाठी विविध अभियान चालवले होते.


राज्यभरातून दहावीच्या परीक्षेला एकूण १६ लाख ११ हजार ६१० विद्यार्थी। बसणार असून यामध्ये मुंबई विभागातून तीन लाख ६० हजार ३१७ विद्यार्थी। परीक्षा देणार आहेत. त्या खालोखाल पुणे विभागातून दोन लाख ७५ हजार ४ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत, तर सर्वात कमी कोकण विभागात २७ हजार विद्यार्थीसंख्या आहे.

 

महाराष्ट्र राज्यातील शालांत परीक्षा यावर्षी नेहमीपेक्षा दहा ते बारा दिवस लवकर होते याचे कारण म्हणजे आपल्या राज्यातील विद्यार्थी स्पर्धात्मक परीक्षा साठी मागे राहू नये व त्यांचा निकाल इतर बोर्डाप्रमाणे लवकर लागावा यासाठी राज्य परीक्षा मंडळ प्रयत्नशील आहे.


शिक्षक सेनेचे राज्य कार्याध्यक्ष श्री शिवाजी शेंडगे राज्य समन्वयक ज्ञानदेव हांडे यांनी परीक्षेला बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिलेल्या  आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)