ठाणे ( शालेय वृत्तसेवा ) :
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे आयोजित स्टार व समग्र शिक्षा अंतर्गत प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तर शिक्षक समृद्धी प्रशिक्षण 2.0 राज्यस्तरीय प्रशिक्षण दिनांक 20 ते 24 जानेवारी 2025 या कालावधीत सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कुसगाव लोणावळा येथे होत आहे. या प्रशिक्षणासाठी ठाणे जिल्ह्यातील 16 शिक्षकांची निवड झाली आहे. या प्रशिक्षणाचे उद्घाटन राज्य विकास आराखडा प्रमुख राजेंद्र वाकडे, संशोधन विभाग प्रमुख दत्तात्रय थिटे, पुणे डायट प्रमुख प्रभाकर क्षिरसागर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.
या प्रशिक्षणासाठी ठाणे डायट प्राचार्य श्री संजय वाघ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्ह्यातून श्रीम हर्षल संजय साबळे, श्रीम सुदर्शना शिरुडे, डॉ. सुनीता बेडसे, श्रीम संगीता गोष्टे, डॉ शुभांगी गादेगावकर, श्री अजितकुमार गायकवाड, श्री सुनील शर्मा, श्रीम योगीता पाटील, श्री शाम शेलार, श्री भुपेंद्र महाजन, श्रीम प्रज्ञा बापट, श्रीम सुमन बंडगर, डॉ दिनानाथ पाटील, श्री देवेंद्र पाटील, श्री बालाजी घुगे, श्री शहाबुल हक सिद्दीकी यांची निवड झाली आहे.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .