स्नेह वाढविणारा सणः मकरसंक्रांत - युसूफ शेख. आंबूलगेकर

शालेयवृत्त सेवा
0

 



देव तिळी आला! गोड गोड जीव झाला!

साधला हा पर्वकाळ!गेला अंतरीचा मळ!

पाप पुण्य गेले! स्नाने ची खुंटले!

तुका म्हणे वाणी!शुद्ध जनार्दन जनी!!


भारतीय संस्कृती ही जगात सर्व श्रेष्ठ संस्कृती आहे, या देशात आपण विविध धर्माचे ,जातीचे लोक राहतात.व त्या त्या जाती धर्मानुसार सण साजरे करतो.यातुन धार्मिक ,सामाजिक ,व राष्ट्रीय एकात्मता निर्माण होण्यास मदत होते .भारत हा सणावारांचा देश म्हणून ओळखला जातो.नविन वर्षातील सुरवातीला येणारा सण म्हणजे मकरसंक्रांती होय. म म्हणजे मधुरता बोलण्यात माधूर्य आसले पाहिजे .क म्हणजे कर्म चांगले केले पाहिजे .र म्हणजे रसना (जीभ) गोड आसली पाहिजे .सं-म्हणजे संधी निर्माण करणे .क्रां -म्हणजे क्रांती घडवणे . त -म्हणजे तत्परता दाखवणे होय, नववर्षाचे उत्साहात आणि आनंदाचे स्वागत करताना काही नवे संकल्प उराशी बाळगले जातात . मकरसंक्रांत हा सण दरवर्षी 14 किंवा 15 जानेवारीलाच येतो. कारण या सणाला आध्यात्मिक वा तसेच शास्त्रीय महत्त्व ही आहे. या दिवसाआधी राञ मोठी असते आणि दिवस लहान असतो.मकरसंक्रांतीच्या दिवशी राञ आणि दिवस समान असतात व 14 जानेवारी पासुन दिवस तीळा तीळा ने मोठा होत जातो. मकर ही एक रास असून सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. म्हणून याला मकर संक्रांती म्हणतात .हवेतील थंडी कमी होऊन उष्णता वाढायला लागते.संक्रांतीच्या आधीच्या दिवसाला भोगी असे म्हणतात .भोगीच्या दिवशी सर्व भाज्या एकञ करुन खातात.व मकरसंक्रांतीच्या दिवशी लहान मुले व स्ञीया "वाण" म्हणून बाजारातील गृहउपयोगी साहित्याची देवाणघेवाण करतात.


संक्रांतीला तीळगुळाचे विशेष महत्त्व असण्यामागे आणखीही एक कारण आहे.या दिवसात शिशिर -पौषातील कडक थंडीमुळे शरीर रुक्ष झालेले आसते.शरीरातील रक्तप्रवाहदेखील गारठ्याने प्रभावित झालेला असतो.रक्तभिसरण मंद झालेले असते.अशा वेळी स्निग्ध आणि उष्ण असे तीळ आणि मधुर तसेच उष्ण असा गुळ यांच्या मिश्रणाने तयार केलेला लाडू अमृताप्रमाणे काम करतो..


धार्मिक कारण :

धर्म शास्ञाप्रमाणे तीळ दान केल्याने शनीचा दुष्प्रभाव कमी होतो.तिळाचे सेवन आणि तीळ मिश्रित पाण्याने स्नान केल्याने पाप नष्ट होतात.निराश मिटते.श्राध्द आणि तर्पणमध्ये तिळाचा प्रयोग दुष्ट आत्मा ,दैत्य ,राक्षस यापासून बाधा होण्यासाठी भीती दुर होते. तसेच माघ मासमध्ये रोज तिळाने प्रभू विष्णू ची पूजा करणाऱ्यांचे सर्व कष्ट दुर होतात.


वैज्ञानिक कारण..या दिवसात नद्यामध्ये बाष्प क्रिया होते ज्याने सर्व प्रकारचे आजार बरे होतात . या दिवसात शरीराचे तापमान आणि बाह्य तापमानामध्ये संतुलन करायचं असतं. तीळ आणि गुळ गरम पदार्थ असल्याने याने शरीराला उष्णता लाभते .या मोसमात तिळगुळ खाल्याने सर्दी-खोकला कमी होतो.कारण तीळामध्ये कापर,म्याग्नेशिअम,ट्रायओफन,आयरन,म्याग्नीज,क्यालशिअम,फास्परस,व्हिटामिन बी-1 आणि फायबर्स असतात.गठीया आजाराने ञस्त लोकांन तिळाने फायदा होतो . 

1) अर्धा चमचा तीळ खाऊन त्यावर कोमट पाणी प्या.थंडिचा ञास कमी होतो.

2) तीळ खाल्याने त्वचा मुलायम होते.

3) बाळंत स्ञीला पुरेसे दूध येत नसेल तर तिला दुधात तीळ घालुन ते प्यायला द्यावे.

4) ज्यांना लघवी स्वच्छ होत नाही त्यांनाही दुध खडीसाखर खाल्यास मुञाशय मोकळे होते .

5) दातांच्या बळकटी साठी तिळाचा वापर करावा.

6)केसांची वाढ चांगली व्हावी यासाठी तिळाचे तेल केसांना लावणे चांगले .


या दिवशी लहान थोर पतंग उडवून आपला आनंद व्यक्त करतात. आनंद व्यक्त करताना पतंग उडवताना पतंगाचा दोरा पशुपक्षांना लागु नये याची खबरदारी घेतलेली बरी..


आनखी एक बाब म्हणजे एरव्ही निषिद्ध असलेला काळा रंग संक्रातीच्या वेळी माञ शुभ मानला जातो..माणसाच्या जीवनात आनेक संकटे येतात जीवनात आनेक बरे वाईट प्रसंग येतात. माणसा माणसात कटुता येते.. भांडणे,प्रेम हे जीनाचे भाग आहे.आजकाल माणसाजवळ माणसाला बोलायला ,भेटायला वेळ नाही. आभासी जगाकडे धावपळ करत आहे..संयम,सहनशीलता,विसरत चालला आहे..स्वतःच्या स्वार्थासाठी आपल्या माणसाला दुर करु पाहत आहे.  कामापुरता मामा.. शब्द. वचन.. पवित्र बंधन.. या पासून दूर जाताना दिसते...भरम साठ जंगलतोड,प्रदुषण,पाणी टंचाई ईत्यादी समस्या उदभऊ लागल्या आहेत.. त्यासाठी शक्य झाल्यास झाडे लाऊ व त्याचे संवर्धन करु....जुणी भांडणे तंटे मिटवून" झाले गेले गंगेला मिळाले..परत आपले  प्रेम उजाळे..असा संकल्प करु..झालेले प्रेम अथवा केलेले प्रेम शेवटपर्यत असेच तेवत ठेवण्याचा,चांगला संकल्प करु ..  


प्रेम करताना आथवा देताना निस्वार्थ भावनेने अथवा कोणत्याही अटी ,शर्थीशिवाय प्रेम करा..आपल्या जीवलग व्यक्तीला जपा हीच खरी संपत्ती आहे..  आपल्या प्रिय व्यक्तीला.. गुण दोषासहीत स्वीकारा.. जाती धर्मा च्या भिंती तोडून माणुसकी ची भिंत उभारू..आपल्या कार्याची पावती देऊन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताला प्राधान्य देऊ.. म्हणजे .. आजच्या सणानिमित्त तरी झाले गेले विसरुन जाऊ .,आपण सारे  भाऊ,भाऊ. या प्रमाणे तीळगुळ देऊन एकमेकाचा मानसन्मान वाढवु.जाती पातीच्या भींती तोडुन माणुसकीची मशाल पेटवु.आपल्या माणसाबद्दल विश्वास ठेऊन पुन्हा प्रेम वाढवु.एकमेकांच्या भावनांचा विचार करु "चुकले असेल काही तर असावी क्षमा...!


विसरा.. राग करा प्रेम जमा!! थोर मोठ्यांचा वाडवडीलांचा आदर ..मोठ्यांना मान सन्मान देऊ..नुसते कामापुरतेच गोड गोड न बोलता आपल्या रसनेत कायमचा गोडवा निर्माण करु.आपली व आपल्या आपल्या परिवाराची काळजी घेऊ.. मिळेल त्या वेळात  प्रेमाची देवान घेऊन करु..अशीच साथ ,संगत,  आयुष्यभर रहावी कारण प्रेमाचे दुसरे नाव "त्याग" आहे. . .असेचआयुष्यभर एकमेकांच्या ह्दयात रहावून . आयुष्यभर प्रेमाची ज्योत . तेवत ठेवली तरच या मकर संक्रांतीचा सण ख-या आर्थाने साजरा झाला असे म्हणायला हरकत नाही. .


"आठवण सूर्याची 

साठवण स्नेहाची

कणभर तीळ

मनभर प्रेम

गुळाचा गोडवा

स्नेह वाढवा..!

तीळगुळ घ्या गोड गोड बोला,....!


-शेख युसूफ मौलासाब आंबुलगेकर 

जि.प.प्रा.शा.लालवाडी  / कंधार 


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)