परीक्षा गुणांबरोबर सद्गुणांची प्राप्ती करणे म्हणजे शिक्षण होय. .दहावी परीक्षा शिबिरात डॉ नांदेडे यांचे प्रतिपादन

शालेयवृत्त सेवा
0

 



नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

        परीक्षेत घेतलेल्या गुणांबरोबरच सद्गुणांची प्राप्ती करणे म्हणजे यशस्वी शिक्षण असल्याचे प्रतिपादन राज्याचे पूर्व शिक्षण संचालक डॉ गोविंद नांदेडे यांनी प्रतिपादन केले आहे. ते नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या पीपल्स महाविद्यालयात संस्थेच्या अमृत महोत्सव कार्यक्रमानिमित्त  बोलत होते.


           स्वामी रामानंद  तिर्थांनी स्थापन केलेल्या  या संस्थेचा  अमृत महोत्सव  विविध रचनात्मक कार्यक्रमांनी संपन्न होत आहे. याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून नांदेड शहरातील नामवंत शाळांतील इयत्ता दहावी परीक्षेला  असणाऱ्या  विद्यार्थ्यांची तयारी कार्यशाळा कुरुंदकर सभागृहात संपन्न झाली त्या प्रित्यर्थ डॉ नांदेडे कार्यशाळेतील विद्यार्थ्यांना संबोधित करीत होते.  महाराष्ट्रातील  ख्यातकीर्त सर्जन डॉ  व्यंकटेश काब्दे यांच्या अध्यक्षतेखाली ही कार्यशाळा संपन्न झाली. 

  

        प्रारंभी स्वामी रामानंद तीर्थ आणि महान विचारवंत नरहर कुरुंदकर गुरुजींच्या  प्रतिमेला  पुष्पहार अर्पण करून दीेप प्रज्वलित करून कार्यक्रमास आरंभ करण्यात आला.  इयत्ता दहावी परीक्षेत कल्पक परिश्रम आणि स्मार्ट अभ्यासाद्वारे  इच्छित उन्नती आणि गुण संपादणुकीचे  अभ्यासमार्ग  याप्रसंगी डॉ नांदेडे यांनी विद्यार्थ्यांना समजाऊन  सांगितले. या प्रसंगी नांदेड एज्युकेशन सोसायटीने अमृत महोत्सव प्रित्यर्थ घेतलेल्या राज्यस्तरीय वक्तृत्व आणि  निबंध  स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना रोख पारितोषिके , सन्मानपत्र , शाल , स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.  प्राचार्य डॉ आर, एम, जाधव यांनी नियमित अध्ययनाचे महत्त्व विषद करून विद्यार्थ्यांना शुभकामना दिल्या. प्रवीण पाटील यांनी इयत्ता दहावी नंतर करियर साठी  उपलब्ध अभ्यासक्रमाची माहिती दिली . 


          आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ व्यंकटेश काब्दे यांनी  विद्यार्थ्यांना अभ्यासाचे महत्त्व विषद करून आजच्या कार्यशाळेचा आणि स्पर्धेतील पुरस्कार कार्यक्रमाचा हेतू विशद करून विद्यार्थ्यांना  प्रेरित करून यशाचा कानमंत्र दिला .  या प्रसंगी विचारपीठावर  संस्था कार्यकारिणीतील  प्रवीण पाटील , प्रदीप नागापूरकर , प्रफुल्ल अग्रवाल, प्राचार्य डॉ आर. एम जाधव, प्रा. डॉ यशपाल भिंगे, प्रा.सचिन पवार, प्रा.अशोक  सिद्धेवाड, प्रा.ए.आर. इनामदार, प्रा.बालाजी पोतुलवार ,  प्रा. विनायक देव आदी मान्यवर उपस्थित होते. 


          या प्रेरणा कार्यशाळेच्या माध्यमातून अभ्यासाची दिशा कळून आल्याचे विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून सांगितले.  या शिबिर कार्यशाळेत  शहरातील विविध शाळेतील पाचशे विद्यार्थी शिक्षक  आणि पालक  सहभागी झाले होते .  कार्यक्रमाचे सूत्र संचालन  डॉ आम्रपाली कसबे  यांनी केले तर आभार प्रदर्शन  उपप्राचार्य ए .आर. इनामदार यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)