निपुण भारत अभियान अंतर्गत निपुण भारत अभियान अंतर्गत श्रावणी केंद्राची कार्यशाळा संपन्न

शालेयवृत्त सेवा
0

 



नंदुरबार ( शालेय वृत्तसेवा ) :

       नवापूर तालुक्यातील श्रावणी केंद्राची निपुण भारत अभियान अंतर्गत निर्धारित करण्यात आलेले सुधारित लक्ष्य कार्यशाळा संपन्न झाली. केंद्रातील ५० टक्के शिक्षक याप्रमाणे दोन दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी श्रावणी केंद्राचे केंद्रप्रमुख महेंद्र नाईक, ग्यान प्रकाशन फाउंडेशन तज्ञ सुलभक क्रांती सोनवणे तसेच तज्ञ सुलभक ईश्वर गावित, बकाराम सूर्यवंशी, धिरज खैरनार, कृष्णा रायते आदीनी मार्गदर्शन केले. 


      राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार तसेच निपुण भारत अभियान मार्गदर्शक सूचनेनुसार विद्यार्थ्यांचे पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान विकसित होण्यासाठी केंद्र व राज्य स्तरावरून विविध उपक्रमांचे नियोजन व अंमलबजावणी करण्यात येत आहे सदर अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणी साठी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. यापूर्वी यानुसार निपुण भारत अभियानाचे उद्दिष्ट बालवाटिका ते इयत्ता तिसरीपर्यंतच्या (३ ते ९ वर्ष वयोगट) सर्व विद्यार्थ्यांनी सन २०२५-२७ अखेर पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान प्राप्त करणे हे होते. सदर वयोगटानुसार इयत्तानिहाय लक्ष्य निर्धारित करण्यात आलेले आहे.

 

       श्रावणी कार्यक्षेत्रातील अभियानाशी संबंधित केंद्रातील सर्व शाळा, शिक्षक, पालक व विद्यार्थी, यांना इयत्तानिहाय सुधारित लक्ष्यबाबत अवगत करावे. याकरिता सर्व आवश्यक माध्यमांचा वापर करावा जेणेकरून सर्वांपर्यंत सदर योग्य माहिती वेळेत पोहोचेल. प्रत्येक शाळामध्ये निपुण भारत अभियान प्रतिज्ञा पोस्टर, भित्तीपत्रक प्रदर्शित करावे, प्रत्येक शाळामध्ये निपुण भारत अभियान सुधारित इयत्ता वयोगटनिहाय लक्ष्य यांचे पोस्टर, भित्ती पत्रक प्रदर्शित करावे, निपुण भारत अभियान अंतर्गत प्रत्येक वर्गात निपुण भारत अभियानाची ध्येये व संबंधित अध्ययन निष्पती उपलब्ध करणे. निपुण भारत अभियान अंतर्गत समाविष्ट वयोगट व लक्ष्य यामध्ये केलेली सुधारणा सर्व संबंधित घटकांना अवगत करण्याबाबत कळविले आहे. 


       निपुण भारत अभियानाचे सुधारित उद्दिष्ट व वयोगट निपुण भारत अभियानामध्ये वर्ष ३ ते ८ वयोगट (पहिले तीन वर्ष बालवाटिका, इयत्ता पहिली व दुसरी) समाविष्ट असेल. निपुण भारत अभियान उद्दिष्ट ३ ते ८ वयोगट (पहिले तीन वर्ष बालवाटिका व इयत्ता पहिली व दुसरी) मधील सर्व विद्यार्थ्यांनी सन जून २०२५-२७ अखेर पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान विषयक लक्ष्य प्राप्त करणे. याविषयी माहिती दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)