नंदुरबार ( शालेय वृत्तसेवा ) :
शहादा तालुक्यातील परिवर्तन केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काथर्दे खुर्द येथील शिक्षिका सौ. हर्षदा कपिल पाटील (मुख्यमंत्री युवा कौशल्य योजना) यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेतील सर्व मुलांना प्रत्येकी एक वही व एक पेनचे वाटप केले. प्रथमतः शाळेतील संपूर्ण शिक्षकांच्या वतीने सौ.पाटिल मॅडम यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आणि शाळेच्या वतीने सौ. पाटिल मॅडम यांना छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो फ्रेम भेट देण्यात आला.
काथर्दे खुर्द शाळेमध्ये नेहमीच मुलांचे तसेच पालक, गावातील जेष्ठ नागरिक, शिक्षणप्रेमी तसेच शाळेतील शिक्षक यांचे सुद्धा वाढदिवस हे शाळेतच साजरे केले जातात हा एक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवला जातो यानिमित्ताने मुलांना काही तरी शिक्षण उपयोगी भेट वस्तू गोडखाऊ मिळते. मुलांमध्ये वाढदिवस हि एक आनंदाची मेजवानी असते, विशेष उत्सुकता असते. शाळेत वाढदिवस साजरे केल्यामुळे मुलांची उपस्थिती वाढण्यास मदत होते. उपस्थिती वाढल्याने साहजिकच गुणवत्ता वाढीसाठी मदत होते असे प्रतिपादन शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा श्रीमती संगिता पाडवी यांनी मनोगत व्यक्त केले.
मुलांनी व्यसनापासून दूर राहून चांगले शिक्षण घ्यावे, दररोज अभ्यास करून कुटुंबाचे, गावाचे तसेच शाळेचे नाव मोठं करावे असे प्रतिपादन श्री कपिल पाटिल यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अहोरात्र मेहनत करून आपले जीवन देशासाठी अर्पण केलेले थोर क्रांतिकारक नेताजी सुभाषचंद्र बोस व हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करत सर्वांनी अभिवादन केले. मुख्याध्यापक श्री. भरत पावरा यांनी शाळेला मिळालेल्या योगदानाबद्दल विशेष अभिनंदन व आभार व्यक्त केले. शाळेतील जेष्ठ शिक्षक श्री. श्रीकांत वसईकर सर यांनी श्री.कपिल पाटिल परिवार हे नेहमीच शाळेसाठी सहकार्य करत असतात असेच सहकार्य पुढिल काळात देखील राहावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा श्रीमती संगिता पाडवी, प्रमुख पाहुणे रेखाताई पाटील, सौ. कोकीळाबेन पाटील, माजी सरपंच सौ गौरीताई वळवी हे होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री तुकाराम अलट सर तर आभार प्रदर्शन श्री खेमा वसावे सर यांनी मानले.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .