नवी दिल्ली ( शालेय वृत्तसेवा ) :
अलीकडेच आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मंजुरी मिळाली आहे. सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना वेतन आयोगाबाबत अधिकाधिक जाणून घ्यायचे आहे. याचा फायदा घेत सायबर ठग लोकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करत आहेत.
कशी होतेय फसवणूक ?
पोलिसांनी सांगितले की, सायबर गुन्हेगार वेतनश्रेणी मोजणीची एक्सेल शीट तयार करून पाठविण्याचा दावा करतात. तिला मोबाईलमध्ये उघडताच फोन हॅक होत आहेत.
निवृत्त कर्मचारी प्रामुख्याने सायबर गुन्हेगारांच्या रडारवर असतात.
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारक हे नेमके काय घडले? सायबर गुन्हेगारांचे सॉफ्ट टार्गेट ठरत आहेत. वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी मिळाल्यानंतर फसवणूक करणाऱ्यांनी वेतन आयोगाच्या अधिक माहितीच्या नावाखाली बनावट लिंक पाठवण्यास सुरुवात केली आहे.
दिल्लीतील एका शिक्षकाने सांगितले की, आठव्या वेतन आयोगाशी संबंधित लिंक मला गुगलवर मिळाली. त्यावर क्लिक करताच मोबाईल हँग झाला. खात्यातून ५५ हजार रुपये काढण्यात आले. त्यामुळे फसवणूक झाली.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .