नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :
अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम म्हणून ०३ सप्टेंबर ते २४ सप्टेंबर २०२४ या कालावधीत बळीराजा डॉट कॉम या संकेतस्थळावर विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२४ जाहिर करून यशस्वीरित्या पार पाडली होती.यावर्षी "भाव शेतमालाचे" हा विषय लेखनासाठी देण्यात आला होता.
सदर स्पर्धा ही ४ वेगवेगळ्या साहित्य प्रकारात होती. यापैकी पद्यलेखन विभागातील गझल प्रकारात नांदेड येथील गझलकार चंद्रकांत देवराव कदम यांच्या "जगणे कास्तकाराचे" या गझलेस "द्वितीय क्रमांक" मिळाला.सलग चौथ्या वर्षी त्यांची गझल पुरस्कारपात्र ठरली आहे.चंद्रकांत कदम हे जि.प.हायस्कुल जवळगाव ता.हिमायतनगर जि.नांदेड येथे शिक्षक असून त्यांचा "समतेच्या डोहाकाठी" मराठी गझलसंग्रह प्रसिद्ध आहे.या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.
जयसिंगपूर ता.शिरोळ जि. कोल्हापूर येथे दि.०८ आणि ०९ फेब्रुवारी २०२५ रोजी संपन्न होत असलेल्या १२ व्या अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलनात "मानचिन्ह, सन्मानपत्र आणि पुस्तके" देऊन विजेत्यांना गौरविण्यात येणार आहे.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .