कै माधवराव पांडागळे गुरुजीच्या पुण्यस्मरनार्थ शैक्षणीक साहीत्य वाटप कार्यक्रमात स्त्रीरोगतज्ञ डॉ शिवाजी शिंदे यांचे प्रतिपादन.

शालेयवृत्त सेवा
0

 



साधुसंतांच्या या देशात प्रत्येकाने आपआपल्या क्षेत्रातील माणूसकी व प्रामाणिक पणा जपावा


नांदेड ( शालेय वृत्तसेवा ):

          साधुसंतांच्या या देशात प्रत्येकाने आपआपल्या क्षेत्रातील माणूसकी व प्रामाणिक पणा जपावा असे प्रतिपादन डॉ शिवाजीराव शिंदे यानी केले. काल दि 3 जानेवारी 2025 रोजी कै माधवराव रावण पाटील पांडागळे गुरुजी यांची 9 वी पुण्यतिथी जि.प.प्रा.शाळा दहिकळंबा ता कंधार येथील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य( स्कुलबॅग, कंपासपेटी) वाटप करून साजरी करण्यात आली.वडीलानी ज्या ज्या गावात नोकरी केली त्या त्या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना दरवर्षी शैक्षणिक साहित्य वाटप करून पुण्यतिथी साजरी करण्याचा उपक्रम अतिशय प्रेरणादायी व समाजपयोगी आहे.कै माधवराव पा पांडागळे गुरुजीचा विद्यार्थी म्हणून मला त्यांचा अभिमान आहे. वडील अडाणी असताना व कोणतीही सुखसुविधा नसताना कै. माधवराव गुरुजी सारख्या समर्पीत गुरुजनामुळेच मी घडलो असी भावना त्यांनी व्यक्त केली.व शिक्षकनेते दत्तप्रसाद पांडागळे व परमेश्वर पांडागळे यांचे अभिनंदन केले.क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व कै माधवराव पांडागळे गुरुजी यांच्या प्रतिमेचे पुजन करून कार्यक्रमाला सुरुवात केली.


          कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे पूर्व शिक्षण संचालक डॉ गोविंदराव नांदेडे तर प्रमुख अतिथी व विशेष सत्कारमुर्ती म्हणून प्रसिद्ध स्त्री रोगतज्ञ डॉ शिवाजीराव शिंदे,प्रमुख उपस्थितीमधे माजी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव कपाळे,भाजपाचे जिल्हाप्रवक्ते संतोष पांडागळे,MGB बँकेचे डीवीजनल मॅनेजर सुदर्शन पांडागळे, शिराढोणचे सरपंच खुशाल पाटील पांडागळे, मालीपाटील व्यंकटराव पांडागळे,STI नंदकुमार भुरे,केंद्रप्रमुख प्रवीण पाटील,शेख जी के,ग्रामविकास अधिकारी अमृत शिंदे, मारोतराव पा शिंदे,दहिकळब्यांचे सरपंच अवधुत पा शिंदे यांची उपस्थिती होती.


         डॉ गोविंद नांदेडे साहेब यांनी स्पुर्तीदायी मार्गदर्शन करताना सदयस्थितीत सर्व सुखसोईनी युक्त वातावरणात विद्यार्थ्यांनी जिद्दीने खुप मेहनत घेवून शिक्षण घ्यावे,उद्याचे उज्वल भविष्य तुमची वाट पाहत आहे.समृद्ध व विकसीत भारत शाळेच्या वर्गखोल्यामधून घडत असतो.शाळा हेच भविष्य निर्माणाचे व समृद्ध भारताचे केंद्र आहे असे सांगुन गावकऱ्यांना शिक्षणाचे महत्व पटवून दिले. तसेच  विद्यार्थी, पालक,व शिक्षकांना अतिशय प्रेरणादायी मार्गदर्शन केले. व पुण्यतिथी निमित शैक्षणिक साहीत्य वाटपाच्या 9 वर्षापासून चालणाऱ्या अंखडीत उपक्रमा बद्दल पांडागळे कुंटूबियांचे अभिंनदन केले.


       यावेळी शिवाजीराव कपाळे, संतोषराव पांडागळे,मारोतराव शिंदे, खुशाल पाटील पांडागळे, व्यंकटराव पांडागळे,अमृत शिंदे यांचीही समायोजीत भाषणे झाली.कार्यक्रमात  क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीचे औचित्य साधुन महिला शिक्षिका सौ.सपना छत्रे व सौ.उमा निलावार यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

    

        प्रास्ताविक कार्यक्रमाचे आयोजक दत्तप्रसाद पांडागळे यानी सुत्रसंचलन शंकर काळेवाड व बाळासाहेब पांडागळे यांनी तर आभार परमेश्वर पांडागळे व बालाजी कनशेटे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक संजय धुत व सर्व शिक्षकानी सहकार्य केले.

    

        कार्यक्रमास घनश्याम पा किडे,शिवदास गुरुजी पांडागळे,शिवराम पांडागळे,गोविंद पा कपाळे,आनंदराव पांडागळे,रामदास पांडागळे, मुकाराम पांडागळे, किशन पा शिंदे,शिवदास रघुनाथ पांडागळे,प्रा सिध्देश्वर शेट्टे,श्रीमती सुभद्राबाई पांडागळे, बालाजी गलांडे, दहिकळब्यांचे सर्व ग्रा प सदस्य,नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.

 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)