नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :
नांदेड तालुक्यातील वाजेगाव केंद्रातील जिल्हा परिषद फत्तेपूर येथील मुख्याध्यापक रंगनाथ सोनटक्के यांनी केंद्रप्रमुख व्यंकट गंदपवाड यांच्या वीटभट्टीवरील मुलांना शाळेत दाखल केलेल्या उपक्रमाची प्रेरणा घेऊन परिसरातील वीटभट्टीला भेट देऊन सर्वेक्षण केले. आणि वीटभट्टीवर काम करण्यासाठी बाहेर गावाहून आलेल्या पालकांची मुले शिक्षणापासून वंचित राहू नये, म्हणून आपल्या शाळेतील सहकारी गजानन बुळगुंडे यांच्यासोबत त्या विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी परिसरातील 13 वीटभट्टीवरील पालकांना प्रत्यक्ष भेट देऊन शाळेत पाठविण्याची विनंती केली.
त्यातील 14 विद्यार्थी यशपाल बाबुराव सावते, संविधान बाबुराव सावते, सोनाली बाबुराव सावते अफसाना अफजल पठाण, आयेशा रहिम शेख, आयान पठाण, प्रीतम डमरू, गणेश शंकर कांबळे, संजीवनी सुदाम वाघमारे, पुष्पांजली भुई, अनुष्का थोरात, भरत वाघमारे, अमन पठाण, शेख आवेद या पहिली ते पाचवी वर्गात दाखल करण्यात आले. मुले शिक्षणाच्या प्रवाहापासून वंचित राहू नयेत म्हणून शाळेने घेतलेल्या पुढाकाराबद्दल गटशिक्षणाधिकारी नागराज बनसोडे, मनपा शिक्षणाधिकारी तथा शिक्षण विस्तार अधिकारी व्यंकटेश चौधरी यांनी अभिनंदन केले आहे.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .