नंदुरबार ( शालेय वृत्तसेवा ) :
नवापूर तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी तथा बीट विस्तार अधिकारी श्री.रमेश चौरे यांच्या प्रेरणेने तसेच कार्यक्रम नोडल अधिकारी श्री.शिलवंत वाकोडे शिक्षण विस्तार अधिकारी नवापूर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील खातगाव बीटातील श्रावणी केंद्र व लहान कडवान केंद्राच्या संयुक्त विद्यमाने शासकीय आश्रम शाळा ढोंगसागाळी येथे उल्लास नवभारत साक्षरता अभियान कार्यक्रमांतर्गत मेळावा आयोजित करण्यात आला होता.
श्रावणी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री.महेंद्र नाईक, लहान कडवान केंद्राचे केंद्रप्रमुख श्री.अमृत वळवी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.दिलीपदादा कोकणी, शासकीय माध्यमिक आश्रमशाळा सागाळी मुख्याध्यापक बाबासाहेब राक्षे, माध्यमिक विद्यालय श्रावणीचे मुख्याध्यापक श्री.प्रभाकर नांद्रे सर, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा श्रावणी केंद्रीय मुख्याध्यापक श्री.भटू बंजारा, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वडसत्रा मुख्याध्यापक श्री.संजय खैरनार, श्री.अनिल गांगुर्डे, माध्यमिक विद्यालय वडसत्रा मुख्याध्यापक श्री.अंबालाल पाटील, माध्यमिक हायस्कूल खातगाव मुख्याध्यापिका श्रीमती.संगीता पवार, लहान कडवान केंद्रीय मुख्याध्यापिका श्रीमती.मंजुळा कोकणी, आदर्श माध्यमिक विद्यालय खडकी मुख्याध्यापक श्री.दासू गावित, माध्यमिक विद्यालय खडकी मुख्याध्यापक श्री.अशोक निकम, प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री.गोपाल गावीत, स्थानिक नागरिक, स्वयंसेवक, नवसाक्षर, शिक्षक आणि सहभागी झाले होते.
मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व सरस्वती मातेचे पूजन करण्यात आले व मुलींनी स्वागतगीत सादर केले. कार्यक्रमाचे उद्घाटन फीत कापून करण्यात आले. खातगाव बीट मधील सर्व शाळांनी शैक्षणिक साहित्य निर्मिती करून आपले स्टॉल लावण्यात आले होते व माहिती देण्यात आली. लहान कडवान केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. अमृत वळवी यांनी उपस्थित त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, राज्य शासनाने केंद्र पुरस्कृत उल्लास नवभारत साक्षरता हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम १४ ऑक्टोबर २०२२ रोजीच्या शासन निर्णयाद्वारे स्वीकारला आहे. हा कार्यक्रम सन २०२२ ते २०२७ या कालावधीत देशभर राबवला जात आहे. तर २५ जानेवारी २०२३ रोजीच्या शासन निर्णयाद्वारे राज्य,जिल्हा, तालुका व शाळा स्तरावरील समित्यांचे गठन करण्यात आले आहे. राज्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी शिक्षण संचालनालय (योजना) या कार्यालयाकडून राज्यस्तरावरून वेळोवेळी या कार्यक्रमाचा ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने आढावा घेण्यात येतो. तसेच क्षेत्रभेटी देण्यात येतात.
यावेळी आलेले अनुभव लक्षात घेता क्षेत्रीय स्तरावर या कार्यक्रमाचा वेळोवेळी आढावा घेणे आवश्यक आहे. या योजनेत असाक्षरांचे सर्वेक्षण व स्वयंसेवक सर्वेक्षण, त्यांची उल्लास अॅपवर ऑनलाईन नोंदणी व जोडणी, साक्षरता वर्ग (अध्ययन अध्यापन), परीक्षेचा सराव, परीक्षा पूर्व व परीक्षोत्तर कामकाजाची कार्यवाही तसेच क्षेत्रीय स्तरावरील जिल्हा, तालुका, शाळास्तर समित्यांचे कामकाज या बाबींचा वेळोवेळी आढावा घेणे आवश्यक आहे. श्रावणी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. महेंद्र नाईक यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, उल्लास नवभारत साक्षरता अभियान साक्षरता आणि शिक्षणाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने एक सामाजिक उपक्रम आहे.
महिला आणि उपेक्षित समुदायांसह शैक्षणिक संधी आणि संसाधने प्रदान करण्यावर लक्ष केंद्रित करते. उल्लास नवभारत साक्षरता मिशन एक साक्षर आणि शिक्षित समाज निर्माण करण्याच्या दृष्टीकोनातून चालवले जाते, जिथे प्रत्येकाला दर्जेदार शिक्षण आणि वैयक्तिक वाढ आणि विकासाच्या संधी उपलब्ध करून देणे, वंचित समुदायांमध्ये साक्षरता आणि शिक्षणाचा प्रचार करणे, शिक्षण आणि साक्षरतेच्या महत्त्वाविषयी जागरूकता निर्माण करणे, शिक्षण आणि कौशल्य प्रशिक्षणाद्वारे व्यक्ती आणि समुदायांचे सक्षमीकरण करणे, साक्षरता केंद्रे आणि शैक्षणिक कार्यक्रमांची स्थापना करणे, शैक्षणिक साहित्य आणि संसाधने प्रदान करणे, जनजागृती मोहीम आणि समुदाय पोहोच कार्यक्रम आयोजित करणे, साक्षरता आणि शिक्षणाला चालना देण्यासाठी स्थानिक संस्था आणि भागधारकांसह भागीदारी, व्यावसायिक प्रशिक्षण आणि कौशल्य विकास कार्यक्रम ऑफर करणे. एकूणच, उल्लास नवभारत साक्षरता मिशन हा एक स्तुत्य उपक्रम आहे ज्याचा उद्देश लोकांच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पाडणे आहे.
साक्षरतेचे महत्त्व वाढवणे आणि समाजातील साक्षरतेची पातळी वाढवण्यासाठी आवश्यक पावले उचलणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता. कार्यक्रमात स्थानिक नागरिकांनी आपले अनुभव सांगितले. साक्षरतेचे महत्त्व वाढविण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याची गरज शिक्षकांनी व्यक्त केली.
उल्लास नवभारत साक्षर अभियानातर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, ज्याचा उद्देश समाजातील साक्षरता पातळी वाढवण्याचा आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा परिषद शाळा ढोंग येथील शिक्षक श्री.धीरज खैरनार यांनी केले तसेच उपस्थितांचे आभार शासकीय आश्रमशाळा सागाळीचे शिक्षक श्री .प्रमोद वसावे यांनी मानले.
उल्लास नवभारत साक्षरता बीटस्तरीय मेळाव्याचे नियोजन श्री. दिनेश पाडवी, श्री. जगदीश कोकणी, श्री. धीरज खैरनार, श्री. गोपाळ गावीत, श्रीमती. मनीषा कोकणी, श्रीमती. संगीत सोनवणे, श्रीमती. मालिनी वळवी, श्री. अभिषेक गायकवाड, श्री. गणेश पाडवी, श्री.राजेंद्र वसावे,श्री. सुबोध वळवी, श्रीमती. तेजस्विनी बिराडे, आश्रमशाळा सागाळी मुख्याध्यापक श्री. पाऊल गावीत सर, श्री. बाबासाहेब राक्षे सर, श्रीमती. यमुना वळवी, श्री. प्रमोद वसावे, श्रीमती. ज्योती वसावे, आश्रमशाळेचे शिक्षकवृंद यांनी केले.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .