नंदुरबार ( शालेय वृत्तसेवा ) :
शहादा तालुक्यातील जि. प.शाळा वाघर्डे येथे केंद्रस्तरीय क्रीडा महोत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला. या स्पर्धेत केंद्रातील १४ शाळांच्या एकूण ४२३ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला होता. स्पर्धेचे उद्घाटन तथा अध्यक्षस्थानी शिक्षण विस्तार अधिकारी श्री. सुनिल तावडे साहेब तर प्रमुख अतिथी पंचायत समिती सदस्या सौ. रोहिणीताई पवार, श्री दिनेश पवार, वाघर्डे ग्रामपंचायतचे सरपंच सौ. शारदाताई मोते, श्री. सखाराम मोते, श्री. प्रताप मोते, पोलीस पाटील श्री. अशोक मोते, केंद्रप्रमुख श्री. शिरीष पाटील, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष सौ. सुमनताई पावरा, पदोन्नती मुख्याध्यापक श्री अमलाल पटले, पदोन्नती मुख्याध्यापक श्री. सुनील साठे, श्री जगदीश बोरसे केंद्र मुख्याध्यापक उपस्थित होते.
उद्घाटन प्रसंगी श्री. दिनेश पवार सर यांनी खेळाचे जीवनातील स्थान आणि महत्व विषद केले. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी श्री सुनील तावडे यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी खेळ, स्पर्धा आवश्यक असतात असे सांगितले.
क्रिडा स्पर्धा अतिशय उत्सवात आणि आनंदमय वातावरणात संपन्न झाल्या. या स्पर्धेसाठी श्री. प्रताप मोते सर यांनी अतिशय सुंदर मशाल तयार केली. यावेळी क्रीडा स्पर्धेची प्रतिज्ञा शिवानी ब्राम्हणे या विद्यार्थिनीने उपस्थित सर्वाना दिली. विशेष म्हणजे प्रा. आरोग्य केंद्र वाघर्डेचे डॉ. गोपाळ पावरा, डॉ. खर्डे व त्यांचे पथक संपूर्ण दिवसभर उपस्थित होते.
त्यानंतर चषक मेडल प्रमाणपत्राचे बक्षीस वितरणाचा कार्यक्रम गटशिक्षणाधिकारी डॉ. योगेश सावळे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना सांगितले की, डॉ. योगेश सावळे यांनी खेळाचे महत्व, खेळामुळे करिअर घडू शकते, स्पर्धेचे जीवनातील महत्व या संदर्भात विचार व्यक्त केले.
प्रास्ताविक क्रीडा समितीचे अध्यक्ष श्री दिनेश चव्हाण यांनी केले. तर सूत्रसंचालन श्री. गोकुळ लोहार यांनी केले. बक्षीस वितरण श्री. प्रवीण अहिरे व आभार प्रदर्शन श्री. राहुल पवार यांनी केले.
स्पर्धेसाठी पंच म्हणून माध्यमिक विद्यालय दामळदा चे श्री. प्रमोद मोरे व श्री टी टि पाटील, विकास हायस्कूल शहादाचे श्री. कैलास पाटील, माध्यमिक विद्यालय जावदे तह चे श्री चौधरी सर व श्री गिरासे सर, माध्यमिक विद्यालय असलोदचे श्री साळुंखे सर या पंचांनी चोख कामागिरी बजावली. यावेळी वैयक्तिक आणि सांघिक स्पर्धा घेण्यात आल्या. त्यामध्ये वैयक्तिक स्पर्धेत धावणे ( मुले )दिपक ईश्वर भिल जि प शाळा वाघर्डे प्रथम, उद्धव भटुसिंग बर्डे जि प शाळा चिखली द्वितीय, सागर दिलीप वळवी जि प शाळा ओझर्टे तृतीय पटकवला. धावणे ( मुली मध्ये ख़ुशी संजय पावरा जि. प. शाळा वाघर्डे प्रथम, मोनू गणेश सुळे जि. प. शाळा शहाणा द्वितीय, सृष्टी संजय चव्हाण जि प शाळा नवानगर तृतीय, लांबउडी ( मुले ) दिपक ईश्वर भिल जि. प. शाळा वाघर्डे प्रथम, ऋतुराज प्रकाश पाडवी जि. प. शाळा शहाणा द्वितीय, उद्धव भटुसिंग बर्डे जि. प. शाळा चिखली तृतीय आला. लांब उडी ( मुली ) ख़ुशी संजय पावरा जि प शाळा वाघर्डे प्रथम, देविका करण ठाकरे जि. प. शाळा ओझर्टे द्वितीय, सोनाली राजाराम पवार जि प शाळा शहाणा तृतीय क्रमांक पटकवला.
यानंतर सांघिक खेळात कबड्डीमध्ये जि प शाळा वाघर्डे विजेता तर जि प शाळा तितरी उपविजेता ठरला. खो- खो मुले मध्ये जि प शाळा वाघर्डे विजेता तर जि. प. केंद्रशाळा जावदे उपविजेता ठरला. खो खो मुली मध्ये जि. प. शाळा भोरटेक विजेता तर जि प शाळा वाघर्डे उपविजेता ठरला. मोठ्या गटात जि.प. शाळा शहाणा संघ प्रथम ठरला. यशस्वी खेळाडू व संघांचे मान्यवरानी कौतुक केले. स्पर्धा यशस्वीतेसाठी केंद्रातील सर्व शिक्षकांचे, प्रशिक्षणर्त्यांचे, ग्रामस्थ्यांचे सहकार्य लाभले.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .