ऊसाच्या फडातील विद्यार्थी केंद्रप्रमुखांनी केले शाळेत दाखल

शालेयवृत्त सेवा
0

 


नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

दरवर्षी हजारो कुटुंब आपल्या उदरनिर्वाहसाठी स्थलांतरित होतात. अशी कुटुंब नांदेड लगत असलेल्या विटभट्टीवर व या भागात ऊस लागवड मोठ्या प्रमाणात असल्याने ऊसतोडी साठी येतात आज वाजेगाव केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा त्रिकुट शाळेस केंद्रप्रमुख व्यंकट गंदपवाड भेट दिली असता शाळेस लागून ऊसतोडणी चालू होती .यात काहि विद्यार्थी तेथिल ट्रकटरवर खेळताना दिसली असता या फडास प्रत्यक्ष भेट देऊन  पालकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले व जवळच असलेल्या त्रिकुट  शाळेत या मुलांना सोबत नेऊन शाळेत दाखल केले.

         

         यात विशाल थोटरमोरे इयत्ता ४थी, श्रीचंदरोडे १ली, पिराजी नामेकर इयत्ता १ली, नयना जगडोंगरे इयत्ता २ री, पुनम गायकवाड इयत्ता ५ वी मध्ये दाखल करण्यात आली याबदल गटशिक्षणाधिकारी नागराज बनसोडे, शिक्षणाधिकारी मनपा तथा शिक्षणविस्तार अधिकारी व्यंकटेश चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)