विद्यार्थ्यांनी स्वनिर्मित चहाचा घेतला आनंद !
सांगली ( शालेय वृत्तसेवा ) :
सरोवर शिक्षण मंडळ सांगली संचलित जीवन विकास मराठी माध्यमिक प्रशाले मध्ये 'दप्तर मुक्त शनिवार' अभियानांतर्गत "चुलीवरचा चहा" हा उपक्रम राबवण्यात आला.
इयत्ता आठवीच्या पुस्तकात मराठी भाषा विषयांतर्गत 'पाड्यावरचा चहा' हा गोदावरी परुळेकर यांनी लिहिलेला पाठ आहे. वारली जमातीच्या लोकांचे जीवन किती कष्टप्रद आहे, त्यांना साधा चहा करणे किती दुरापास्त आहे, त्यांचे राहणीमान याचे वर्णन या पाठात आले आहे. यापासून प्रेरित होऊन इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी आज स्वतः उत्स्फूर्तपणे चुलीवर चहा केला. चहासाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांची जुळवा- जुळव विद्यार्थ्यांनी केली.
यानिमित्ताने विद्यार्थ्यांनी स्वनिर्मित चहाचा आनंद घेतला . चहा तयार करण्याची कृती, लागणारे साहित्य व त्याचे प्रमाण या सर्वांचा अनुभव विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिकातून घेतला.
या उपक्रमाला संस्था अध्यक्ष मा. एफ. एम. अकिवाटे, सचिव मा. हारूनरशीद मुल्ला यांचे मार्गदर्शन व .मुख्याध्यापक मा. श्री कुरणे सर व शिक्षक वृंद, पालक वर्ग यांचे सहकार्य लाभले.रहमान फत्तेपूर, अरहान मुलाणी, जिशान विजापुरे, अबूझर पठाण,रिहान नाईकवडी, साद अत्तार, अरबाज पेंढारी या विदयार्थ्यांनी विशेष सहभाग घेतला.सौ. विद्या चौगुले यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .