कागद खरेदी, छपाईबद्दल काटेकोर निर्णय
नवी दिल्ली: राष्ट्रीय शैक्षणिक अनुसंधान आणि प्रशिक्षण परिषदेने (एनसीईआरटी) प्रकाशित केलेल्या इयत्ता ९ वी ते १२ वी इयत्तांच्या पाठ्यपुस्तकांच्या किमती आगामी शैक्षणिक वर्षात २० टक्क्यांनी कमी होणार आहेत. ही घोषणा या संस्थेने केली आहे.
एनसीईआरटीचे संचालक दिनेशप्रसाद सकलानी यांनी एका कार्यक्रमात ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, एनसीईआरटीच्या अतीत ५ कोटी प्रतींची छपाई पाठ्यपुस्तकांच्या किमती पहिल्यांदाच पाठ्यपुस्तकांच्या ४ ते ५ टक्क्यांनी कमी करण्यात आल्या आहेत. पाठ्यपुस्तकांसाठी लागणाऱ्या कागदाची यंदाच्या वर्षी अतिशय काटेकोरपणे खरेदी करण्यात आली, तसेच छपाईसाठी नवीन यंत्राची जोड देण्यात आली. त्यामुळे खर्चात जी बचत झाली त्याचा फायदा विद्यार्थ्यांना मिळाला पाहिजे असा विचार करून पाठ्यपुस्तकांच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय शिक्षण खात्याचे मंत्री धर्मेंद्र प्रधान होते.
त्यांनी सांगितले की, इयत्ता पहिली ते आठवीसाठी एनसीईआरटीने प्रसिद्ध केलेल्या पाठ्यपुस्तकांची किंमत प्रत्येक प्रतीसाठी ६५ रुपये ठेवण्यात आली आहे. एनसीईआरटीच्या मुख्यालयात सभागृह बांधण्यात येणार असून, त्याच्या पायाभरणी समारंभप्रसंगी सकलानी यांनी पाठ्यपुस्तकांबाबत घोषणा केली.
त्यांनी सांगितले की, एनसीईआरटी व फ्लिपकार्ट यांच्यात सामंजस्य करार झाला आहे. त्यामुळे एनसीईआरटी पाठ्यपुस्तकांच्या वितरण व विक्रीचा आवाका वाढणार आहे. पाठ्यपुस्तकांसाठी लागणाऱ्या कागदाची यंदाच्या वर्षी अतिशयया काटेकोरपणे खरेदी करण्यात आली.
■ एनसीईआरटी दरवर्षी ३०० कोटी प्रतींची छपाई करते. प्रकारच्या पाठ्यपुस्तकांच्या ४ ते ५ एनसीईआरटीने अॅमेझॉन व अन्य
■ या पाठ्यपुस्तकांच्या विक्रीसाठी काही कंपन्यांशीही करार केले आहेत.
■ त्यामुळे देशभरात ही पाठ्यपुस्तके सहजपणे उपलब्ध होऊ शकतील.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .