देशभरातील ८२ हजार विद्यार्थ्यांना कमी खर्चात संधी
नवी दिल्ली ( शालेय वृत्तसेवा ) :
केंद्रीय मंत्रिमंडळाने देशात ८५ नवी केंद्रीय विद्यालये तसेच २८ नवी नवोदय विद्यालये उघडण्यास परवानगी दिली आहे. केंद्रीयमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली.
या निर्णयामुळे देशभरातील ८२ हजार विद्यार्थ्यांना कमी खर्चात उच्च दर्जाचे शिक्षणाची संधी मिळणार असल्याचे यासंबंधी प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. २०२५-२६पासून ८५ नवीन केंद्रीय विद्यालयांची स्थापना आणि सध्याच्या विद्यालयांच्या विस्तारासाठी सुमारे ५,८७२ कोटी रुपयांची आवश्यकता असून, सध्या सुरू असलेल्या अशा केंद्रीय विद्यालयांची संख्या १,२५६ आहे.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .