नंदुरबार ( शालेय वृत्तसेवा ) :
जिल्हा परिषद नंदुरबार शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने २०२४-२५ या शैक्षणिक वर्षातील नवापूर तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन ॲग्रीकल्चरल हायस्कूल व ज्युनियर कॉलेज खांडबारा येथे दि.२३ व २४ डिसेंबर रोजी सुरू झाले. शाश्वत भविष्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान या विज्ञान प्रदर्शनाच्या मुख्य विषयावर आधारित शहरातील इयत्ता ६ वी ते १२ वीच्या सर्व माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थी तसेच शिक्षक, प्रयोगशाळा परिचर व सहाय्यक यांची शैक्षणिक उपकरणे व अध्यापक शैक्षणिक साहित्य निर्मिती यांचा सहभाग आहे. विविध शाळांतील उपकरणांचा यात सहभाग होता.
बक्षीस वितरण समारंभाच्या प्रसंगी जिल्हा परिषद नंदुरबार सदस्य भरत भाऊ गावीत, जिल्हा नंदुरबार प्राथमिक शिक्षणाधिकारी वंदना वळवी, जि.प.नंदुरबार शालेय पोषण आहार विभाग पाटील सर, सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रयोगांचे व प्रकल्पांचे अवलोकन करून विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक केले.
आपले सगळे जीवन हे विज्ञानावर अवलंबून असून विज्ञानाची भूमिका अतिशय मोलाची आहे. या प्रदर्शनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी लागेल आणि त्यांना अधिक रस निर्माण होईल, असे प्रतिपादन भरतभाऊ गावीत यांनी केले. विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन नवापूर तालुक्याचे आमदार शिरीषकुमार नाईक यांच्या हस्ते करण्यात आले होते. याप्रसंगी जिल्हा परिषद नंदुरबार माध्यमिक उपशिक्षणाधिकारी डॉ. यूनुस पठाण, नवापूर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी रमेश चौरे, अॅग्रीकल्चरल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय खांडबारा प्राचार्य श्रीमती मीना वळवी, नवापूर तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे सचिव अंबालाल पाटील, नवापूर तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष मिलिंद वाघ, शिक्षण विस्तार अधिकारी रमेश देसले, शिक्षण विस्तार अधिकारी शिलवंत वाकोडे, श्रावणी केंद्रप्रमुख महेंद्र नाईक, सर्व शाळांचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
मान्यवरांकडून शिक्षक शैक्षणिक साहित्य निर्मिती स्टॉलवर भेट देऊन माहिती घेतली. अध्यापक गोपाल गावीत यांनी स्व- निर्मित शैक्षणिक साहित्याचे महत्त्व आनंददायी शिक्षण म्हणजे शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन जो विद्यार्थ्यांसाठी सकारात्मक आणि आनंददायक शिकण्याचा अनुभव तयार करण्यावर लक्ष केंद्रित करतो. गुंतवणारा आणि परस्परसंवादी शिकण्याच्या क्रियाकलाप आकर्षक, परस्परसंवादी आणि मजेदार होण्यासाठी डिझाइन केलेले आहेत. विद्यार्थी-केंद्रित शिकण्याची प्रक्रिया विद्यार्थ्याच्या गरजा, आवडी आणि शिकण्याची शैली यावर केंद्रित असते. निवांत आणि तणावमुक्त शिक्षणाचे वातावरण आरामशीर आणि तणावमुक्त आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना आरामदायी आणि लक्ष केंद्रित करता येते. हँड्स-ऑन आणि अनुभवात्मक शिकण्याच्या क्रियाकलापांमध्ये प्रत्यक्ष अनुभव, प्रयोग आणि वास्तविक-जगातील अनुप्रयोग समाविष्ट असतात. अभिप्राय आणि प्रोत्साहन आत्मविश्वास आणि प्रेरणा निर्माण करण्यात मदत करण्यासाठी विद्यार्थ्यांना नियमित फीडबॅक आणि प्रोत्साहन मिळते.
फायदे, सुधारित प्रेरणा शिकण्याचे आनंददायी अनुभव विद्यार्थ्यांची प्रेरणा आणि शिकण्याचा उत्साह वाढवू शकतात. उत्तम धारणा जेव्हा शिकणे आनंददायक असते, तेव्हा विद्यार्थी माहिती टिकवून ठेवण्याची आणि ती नंतर आठवण्याची अधिक शक्यता असते. कमी झालेला ताण आरामशीर आणि तणावमुक्त शिक्षण वातावरण विद्यार्थ्यांची चिंता आणि तणाव कमी करण्यात मदत करू शकते. वाढलेली सर्जनशीलता शिकण्याचे आनंददायी अनुभव सर्जनशीलता, गंभीर विचार आणि समस्या सोडवण्याची कौशल्ये वाढवू शकतात. याविषयी माहिती दिली.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .