विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच शिक्षणाचे उद्दिष्ट! - शिक्षणमंत्री दादा भुसे

शालेयवृत्त सेवा
0

 



मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) :

         राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी एका आगळ्यावेगळ्या पद्धतीने आपल्या मंत्रीपदाचा कार्यभार मंत्रालयात स्वीकारला. नाशिक जिल्ह्यातील जिल्हा परिषद, खाजगी संस्था, समाज कल्याण, आदिवासी विकास विभागाच्या शाळेतील पन्नास विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत मंत्री दादा भुसे यांनी मंत्रालयात आज आपला पदभार स्वीकारला यावेळी राज्य मंत्री पंकज भोयर नाशीक विभागीय मंडळाचे अध्यक्ष सुभाष बोरसे, मुंबईचे शिक्षण उपसंचालक संदीप संगवे व मंत्री महोदय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थीत होते. 


       शिक्षण विभागाचा रोड मॅप तयार करून चांगले काम करून दाखवणार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिक्षण विभागाची जबाबदारी नाशिकवर सोपवली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनुमोदन दिले आहे. ज्या संवेदनेने त्यांनी शिक्षण विभागाची जबाबदारी माझ्यावर दिली. त्यामुळे मला जाणीव आहे. शिक्षण मंत्री  हे एक मोठं आव्हानात्मक काम आहे. शिक्षक, पालक, विद्यार्थी व शिक्षण अधिकारी व या क्षैत्रात कार्य करणाऱ्या लोकांच्या सहकार्याने विद्यार्थ्याला केंद्रबिंदू मानून आम्ही येणाऱ्या काळात चांगल्यात चांगले काम करून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केले. 


        शिक्षण विभागाचा रोड मॅप तयार करणार असून विद्यार्थी, पालक, शिक्षक सर्वांशी चर्चा करून प्राधान्यक्रम ठरविणार आहे. तर स्वच्छता गृह, शाळा दुरुस्ती, ई – शाळा सुरू करणे, असे अनेक उपक्रम राबवणार.पत्रकारांशी राजकीय चर्चा नकरता केवळ शैक्षणिक गोष्टींवर त्यांनी भाष्य केले. विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे कमी करणे, शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी समन्वय साधने, विद्यार्थ्यांचा सकस आहार, विद्यार्थी सुरक्षा, गणवेश, माध्यांन भोजन या गोष्टींना प्राधान्य देण्याचे सुतोवाच शिक्षण मंत्र्यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)