पालकांनी आपल्या दिव्यांग मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणावे - शिक्षणाधिकारी व्यंकटेश चौधरी

शालेयवृत्त सेवा
0

 



जागतिक दिव्यांग दिनानिमित्त मनपा शाळेतील दिव्यांग बालकांचा सत्कार


नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

सर्वसामान्य व्यक्तींना ज्ञानाची पाच इंद्रिये असतात. मात्र दिव्यांग मुलांना निसर्ग नैसर्गिकपणे एखादा कोणता अवयव कमी देतो परंतु ज्ञान घेण्याचे सहावे इंद्रिय त्याला बहाल करीत असतो. म्हणून दिव्यांग मुलांच्या पालकांनी आपल्या मुलाकडे सहानुभूतीने न पाहता भविष्यात त्या मुलांमध्ये कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्याची क्षमता असते हे लक्षात घेऊन त्या मुलांच्या शिक्षणासाठी प्रयत्न करावेत. त्यासाठी विविध प्रकारच्या सवलती सोयी सुविधा शासनाने उपलब्ध करून दिलेले आहेत, त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मनपा शिक्षणाधिकारी व्यंकटेश चौधरी यांनी केले. 

           

         ते दिव्यांग दिनाच्या निमित्ताने मनपा शाळा लेबर कॉलनी येथे महानगरपालिका शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दिव्यांग बालकांचा सत्कार या कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून बोलत होते. यावेळी म्हणून डॉ. उमेश आत्राम, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय नांदेड येथील या विषयातील तज्ञ प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.

 

            यावेळी विचार मंचावर जिल्हा समन्वयक संजय ढवळे, डॉ. आशिष योहान, मनपा शाळेच्या मुख्याध्यापिका रेश्मा बेगम, विषय तज्ञ संदीप लबडे यांची उपस्थिती होती. प्रारंभी लुई ब्रेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार करून अर्पण करून उपस्थित मान्यवरांचे शाळेच्या वतीने शाल पुष्पहार आणि पुस्तक देऊन स्वागत करण्यात आले. या सोहळ्याचे प्रास्ताविक संदीप लबडे यांनी केले. प्रमुख पाहुणे डॉ. उमेश अत्राम यांनी दिव्यांग बालकांच्या विकासासाठी त्यांच्या शिक्षणासाठी विविध प्रकारच्या सवलती सोयी सुविधा शिष्यवृत्ती या शासनाकडून दिल्या जातात, पालकांनी या सर्व बाबींचा लाभ घ्यावा, तसेच दिव्यांग बालकांच्या मदतीसाठी साधनेही उपलब्ध असतात त्याचाही लाभ घेण्यात यावा असे आवाहन उपस्थित पालकांना केले. 


            यानंतर उपस्थित दिव्यांग बालकांना पुष्प आणि बिस्किट देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कीर्ती पुंजपवार यांनी केले तर आभार बाबू पठाण यांनी मानले. शाळेच्या मुख्याध्यापिका रेशमा बेगम, सुजाता सुनेपवार, राहीन कौसर, चरकुलवार के. जी, भालेराव एच व्ही, इंगोले एस ए, गायकवाड डी डी, घोणे एम.डी. यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)