राज्यात अपारचे ७१ टक्केच काम पूर्ण : आधार कार्ड मॅच होत नसल्याने अडचणीत वाढ

शालेयवृत्त सेवा
0

 




राज्यात ५५ लाख विद्यार्थी 'अपार' आयडीपासून दूरच !


यवतमाळ ( शालेय वृत्तसेवा ) :

         विद्यार्थ्यांना 'एक देश, एक स्टुडंट' अंतर्गत अपार आयडी देण्यात येणार आहे. 'अपार'च्या कामाला मिशन मोडवर सुरुवात झाली असली तरी अजूनही ५५ लाख विद्यार्थी अपार आयडीच्या नोंदणीपासून दूरच आहेत. राज्यभरात आतापर्यंत ७१.०६ टक्केच काम पूर्णत्वास आले आहे. कामाची संथगती बघता अपार आयडीची नोंदणी शंभर टक्के पूर्ण करावी, असे निर्देश व्हीसीद्वारे शिक्षण विभागाला देण्यात आले आहेत.


         अपारचा अर्थ ऑटोमेटेड परमनंट अकॅडमिक अकाऊंट रजिस्ट्री असा आहे. याअंतर्गत विद्यार्थ्यांना एक ओळखपत्र मिळणार आहे. आधार काप्रमाणे या १२ अंकी ओळखपत्रामुळे विद्यार्थ्यांना अनेक फायदे होणार आहेत. यात स्कोअर कार्ड, मार्कशीट, ग्रेडशीट, पदवी, डिप्लोमा, प्रमाणपत्र यासह विद्यार्थ्यांची सर्व माहिती राहणार आहे. राज्यात एक लाख आठ हजार ४४३ शाळा असून, एकूण विद्यार्थी संख्या दोन कोटी पाच लाख ७१ हजार ५८३ आहे.


         जिल्हा अमरावती, नागपूर जिल्हा रत्नागिरी पिछाडीवर अपार आयडी नोंदणीत राज्याची टक्केवारी ७१.०६ आहे. २१ जिल्ह्यांनी ७० टक्केचा आकडा पार केला आहे. यात अमरावती व नागपूर हे दोन्ही जिल्हे पिछाडीवर आहेत. अमरावती जिल्ह्यात ५९.९४ तर, नागपूर जिल्ह्यात ५६.२९ टक्केच अपार आवडीची धुळे नोंदणी झाली आहे.


          १३ डिसेंबरपर्यंत एक कोटी ४६ हजार १७ हजार ७६५ विद्यार्थ्यांच्या अपार नोंदणीचे काम आटोपले आहे. ५५ लाख ८९ हजार ८१३ विद्यार्थी अपार नोंदणीपासून दूर आहेत. काही विद्यार्थ्यांचे आधार कार्ड मॅच होत नसल्याची अडचण निर्माण झाली आहे. पालकांचे संमतीपत्र देखील आवश्यक आहे. तेदेखील देण्यात येत नसल्याचे सांगितले जाते.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)