अक्षर परिवारातील उपक्रमशील शिक्षकांना 'शिक्षकभूषण' जाहीर

शालेयवृत्त सेवा
0

 



 शिक्षणाधिकारी दिलीप बनसोडे यांच्या हस्ते वितरण


नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

         अक्षर परिवार शिक्षण विभाग वाजेगावचे शिक्षण विस्तार अधिकारी तथा साहित्यिक व्यंकटेश चौधरी यांच्या संकल्पनेतून  दरवर्षी अक्षर परिवारातील उपक्रमशील शिक्षकांचा "शिक्षक भूषण" पुरस्काराने सन्मान करण्यात येतो. या शैक्षणिक वर्षाचा पुरस्कार वाजेगाव येथील सहशिक्षिका शाहीन बेगम अब्दुल रशिद, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाडीपुयड येथील श्रीमती सविता सुधाकर पत्की व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इंजेगाव येथील सहशिक्षिका सौ. प्रणिता पारप्पा आकोशे यांना घोषित करण्यात आला आहे.  


          शनिवारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फत्तेपूर येथे शिक्षणाधिकारी ( योजना) मा. दिलीपकुमार बनसोडे यांच्या हस्ते तर गटशिक्षणाधिकारी नागराज बनसोडे, शिक्षण विस्तार अधिकारी तथा शिक्षणाधिकारी मनपा व्यंकटेश चौधरी यांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. 


        पुरस्कार निवड समितीचे सदस्य दत्तप्रसाद पांडागळे, अक्षय ढोके आणि व्यंकट गंदपवाड यांनी पुरस्कारार्थींची निवड केली आहे. शनिवारी केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेत पुरस्कार वितरण करण्यात करण्यात येणार असून, वाजेगाव केंद्रातील मुख्याध्यापक व शिक्षकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन केंद्रप्रमुख व्यंकट गंदपवाड यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)