निंबीपाडा मो. शाळेत बाल आनंद मेळाव्याचे आयोजन

शालेयवृत्त सेवा
0

 


नंदूरबार ( शालेय वृत्तसेवा ) :

      अक्कलकुवा तालुक्यात जि.प.शाळा निंबीपाडा (मोलगी) ही शाळा शालेय स्तरावर विवीध उपक्रम घेण्यात नेहमीच अग्रेसर राहीली आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणे हा या शाळेचा मुख्य उद्देश राहीला आहे. मागील महिन्यात मतदान जनजागृती करीता शाळेने लघुपट तयार केला होता. तो लघुपट सोशल मिडायावर चांगलाच चर्चेचा विषय राहिला होता.


       शाळेतील विद्यार्थी कोणत्याही क्षेत्रात मागे राहु नये, समाजात वावरताना शिक्षणाबरोबर कौशल्याची जोड ही त्याना मिळावी. शिक्षणाबरोबरच व्यावहारिक ज्ञानाची गरज लक्षात घेऊन आज जि.प.शाळा निंबीपाडा(मोलगी) शाळेत बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. 


         आज झालेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून केंद्र प्रमुख मनोज साळवे, अध्यक्ष माकत्या वसावे, पदोन्नती मुख्याध्यापक लक्ष्मण पाडवी, प्रभाकर चव्हाण, भगवान सोनवणे सर, ॲड. अमर वसावे, नारसिंग वसावे, बिज्या वसावे, दारासिंग पाडवी, बलवंत वसावे शालेय व्यवस्थापन समिती सदस्य, ग्रामस्थ, पालक व विद्यार्थी उपस्थित होते. 


          सर्व प्रथम उपस्थितांचा स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला. उपस्थितांचे स्वागत शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. शाळेतील १ली ते ८वी वर्गातील विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात भाजीपाला व चवदार खाद्य पदार्थांचे स्टाॅल लावले होते. पदार्थांच्या विक्रीची सुरूवात म्हणून उपस्थितांच्या हस्ते रिबन कापुन उद्घाटन करून सुरूवात करण्यात आली. विद्यार्थ्यांना लहान वयातच व्यावसायिकता समजावी, व्यवहार ज्ञान अवगत व्हावे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. शाळेतील विद्यार्थ्यांनी परिसरात मिळणाऱ्या भाजीपाल्याचे स्टॉल लावले होते. चवदार पदार्थात भजे, जलेबी, गुलाब जाम, वडे, पोहे, कुरकुरे, पोंगे, पाणीपुरी, खमंग, बिस्कीट त्याच बरोबर वह्या,पेन- पेन्सिल आणि विवीध फळात केळी, पेरू, बोर,ऊस आणि आवळ्यांची दुकाने लावली होती. 

     

         कार्यक्रमाचे अधिकृत उद्घाटन होताच विद्यार्थी व पालकांची खरेदीसाठी एकच झुंबड उडाल्याचे दिसुन आले. वस्तू खरेदी विक्रीत विद्यार्थ्यांनी आपली व्यावहारिक व व्यावसायिक कौशल्ये पणाला लावल्याचे दिसून आले. बाल आनंद मेळाव्याला एक प्रकारे यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. आज झालेला कार्यक्रम शिस्तबद्ध व्हावा करिता शाळेतील सर्व शिक्षकांनी मोठी मेहनत केल्याचे दिसून आले. स्टाॅल साठी टेबल ची व्यवस्था, बैठक व्यवस्था, करण्यात आलेली सजावट पाहण्यासारखे होते. मनसोक्त चाललेल्या मेळाव्याची सलग तीन तासानंतर सांगता करण्यात आली. 

  

         आज झालेल्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विषय शिक्षक मगन पाडवी सर, सरदार वळवी सर, गोविंदसिंग पाडवी सर, नितेश वळवी सर,संजय वसावे सर, आयमनसिंग नाईक सर, काळुसिंग वळवी सर, संकेत वळवी सर व गणेश पावरा सर यांनी पुढाकार घेतला. सूत्रसंचालन मगन पाडवी सर व समारप सरदार वळवी सर यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)