२१ डिसेंबर हा जागतिक ध्यान दिवस म्हणून जाहीर

शालेयवृत्त सेवा
0



संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत प्रस्ताव मंजूर


संयुक्त राष्ट्र : २१ डिसेंबर हा जागतिक ध्यान दिवस म्हणून साजरा केला जावा हा लिकटेंस्टिन या देशाने मांडलेला व भारतासह अनेक देशांनी अनुमोदन दिलेला प्रस्ताव संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने शुक्रवारी एकमताने मंजूर केला. ही माहिती संयुक्त राष्ट्रांतील भारताचे प्रतिनिधी पर्वतनेनी हरीश यांनी दिली.


         त्यांनी म्हटले आहे की, २१ डिसेंबर हा जागतिक ध्यान दिवस म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रांनी मंजूर केला. वसुधैव कुटुंबकम (संपूर्ण जग एक कुटुंब आहे) अशी भारताची धारणा आहे. माणसाच्या कल्याणासाठी सर्व जगाने एकजुटीने प्रयत्न करायला हवे, असे भारताला वाटते.


       जगभरात २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यासाठी २०१४ साली भारताने पुढाकार घेतला होता. त्याची आठवण करून देत पर्वतनेनी हरीश यांनी म्हटले आहे की, जागतिक योग दिन ही गेल्या दहा वर्षांत जागतिक चळवळ बनली आहे. जगभरातील कोट्यवधी लोक योगासनांचे धडे घेत आहे. तो त्यांच्या दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा भाग बनला आहे. 


'आधुनिक काळातही ध्यानाचे महत्त्व कायम'


■ भारताने म्हटले आहे की, ध्यानधारणा ही प्राचीन काळापासून विकसित झाली आहे. आजच्या आधुनिक जगातील बदलांना सामोरे जाताना तसेच मानसिक शांती मिळविण्यासाठी ध्यानधारणा आवश्यक आहे. 

■ लिकटेंस्टाइनने मांडलेल्या ठरावाला भारत, बांगलादेश, बल्गेरिया, बुरुंडी, डोमिनिकन रिपब्लिक, आइसलँड, लक्झेंबर्ग, मॉरिशस, मोनाको, मंगोलिया, मोरोक्को, पोर्तुगाल आणि स्लोव्हेनिया या देशांनी अनुमोदन दिले होते.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)